बिग बॉस मराठी सीझन 2 ची शेवटची नॉमिनेशन प्रक्रिया काल पडली. सध्या नेहा आणि शिवानी हे दोनच सदस्य सुरक्षित आहेत. मात्र कालचा नॉमिनेशन टास्क अपूर्ण राहिल्याने चार सदस्य शिव, वीणा, आरोह आणि किशोरी या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने वीणाला फार त्रास होतो, ती बाथरूममध्ये जाऊन रडू लागले. तर बाहेर शिवानी, नेहा आणि आरोह याबाबत चर्चा करताना दिसतात. शिव जेव्हा वीणाची समजूत काढायला जातो त्यावेळी शिवानी किती चुकीचे वागत आहेत ते वीणा त्याला समजून सांगते. रात्री याच मुद्यावर बिचुकले आणि किशोरीही चर्चा करताना दिसतात. यावेळी किशोरी भावूक होऊन रडू लागतात.
आतापर्यंत शिवानीची खेळी कधीच फेअर राहिली नाही. सतत चिडणे, टोमणे मारणे, ओरडणे असे करत तिने घरातील वातावरण बिघडून टाकले आहे. याबद्दल पुन्हा एकदा वीणा आणि शिव चर्चा करतात. दुसऱ्या दिवशी उठल्यावर वीणा घरातून बाहेर जावी असे आपल्याला वाटते असे शिवानी किशोरी यांना सांगते. परत घरात शिवानीपुराण आणि इतर अनेक भांडणांचे मुद्दे निघतात. त्यानंतर बिग बॉसकडून ‘लगोरी’ची कार्य देण्यात येते. (हेही वाचा: बिग बॉसच्या विजेत्याची किंमत ठरली 17 लाख; आरोह, शिव, वीणा आणि किशोरी झाले नॉमिनेटेड)
खेळाची सुरुवात झाल्यावर टीम A लागोरीला बॉल मारू शकत नाहीत त्यामुळे त्यांना 0 गुण मिळतात. तर टीम B 0-1-0 अशा गुणसंख्येंनी विजयी ठरते. त्यानंतर आज बिग बॉसचा वाढदिवस असल्याने ‘बीबी बर्थडे पार्टी’ हे कार्य सोपवले जाते. यामध्ये बिग बॉस सांगतील तसे टास्क करायचे आहेत. प्रत्येक सदस्याला एक गाणे दिले जाते ते गाणे वाजल्यावर त्या सदस्याला स्टेजवर जाऊन डान्स करायचा आहे. एक एक करत सर्वांसाठी गाणे वाजते व सर्वजण आपल्या नृत्याची कला सादर करतात.
त्यानंतर बिग बॉस सदस्यांना काही सजावटीच्या वस्तू पाठवतात व घर सजवण्यास सांगतात. यामध्ये बिचुकले काही सजावट करतात ते नेहा काढून टाकते यावरून बिचुकले नेहावर चिडतात. नेहा आपल्याशी फार खोटे बोलली आहे असा आरोपही ते करतात. नंतर फुगे फुगवून ते फोडण्यासही सांगितले जाते. शिव फुगे फुगवतो तर किशोरी ते फोडण्याचा प्रयत्न करते. त्यांनतर बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त केक कापला जातो. हा केक फक्त दोनच सदस्यांनी संपवणे अनिर्वाय आहे. शेवटी वीणा आणि शिव हा केक संपवायचा प्रयत्न करतात. शेवटी सर्वांसाठी एक कॉमन गाणे वाजवून हा बीबी बर्थडे टास्क संपतो.