Bigg Boss Marathi 2, 17 June, Episode 23 Updates: कॅप्टन होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये धक्काबुक्की; यंदाच्या आठवड्यात वैशाली माडे ठरली कॅप्टन
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 22 Episode: बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज पुन्हा नव्या आठवड्याच्या कॅप्टनसी पदासाठी टास्कला सुरुवात झाली. यंदा कॅप्टनसी पदासाठी वैशाली माडे आणि दिगंबर नाईक ही नावे चर्चेत होती. मात्र दिगंबर नाईक घराबाहेर पडल्याने वैशाली ही कॅप्टनसीसाठी एकमेव उमेदवार ठरली. त्यामुळे बीग बॉसने घरातील सदस्यांनी मिळून दुसरा उमेदवार द्यावा, असे सांगतिले. त्यावर अनेकांनी परागच्या बाजूने कौल दिला. मात्र यावर नेहा आणि अभिजीत केळकर यांनी आपेक्ष घेतला. त्यानंतर सर्वांनुमते बाप्पा म्हणजेच विद्याधर जोशी हे कॅप्टनसी पदासाठी दुसरे उमेदवार ठरले. मात्र यंदा कॅप्टनसी पदासाठी तिसरा उमेदवार आपल्या कर्तबगारी ठरेल, असे बिग बॉसने जाहीर केले. त्यासाठी इच्छुक स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला. तो टास्क जिंकत अभिजीत केळकर कॅप्टनसी पदासाठी तिसरा उमेदवार ठरला.

कॅप्टनसी उमेदवारासाठी एक टास्क घेण्यात आला. त्यात जो इच्छुक स्पर्धक कॅन्फेशन रुममध्ये सर्वात आधी जाईल तो कॅप्टनसी पदाचा तिसरा उमेदवार ठरेल असे सांगण्यात आले. या टास्कसाठी घरातील सदस्यांमध्ये चक्क धक्काबुक्की झाली. यात शिव आणि नेहामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत नेहाला पडली. तर अभिजीत केळकर प्रथम कॅन्फेशन रुममध्ये पोहचला. त्यानंतर नेहा आणि शिवमध्ये भांडण झाले. या भांडणात शेफ परागनेही उडी घेतली आणि पराग-शिव यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. या सर्व प्रकारानंतर बिग बॉस समोर शिव आणि नेहा या दोघांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर घरातील 8 जणांनी बिग बॉससमोर शिव याला घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट केले. (बिग बॉसच्या घरात साजरा झाला 'Fathers Day', दिगंबर नाईक या आठवड्यात घराबाहेर)

कॅप्टनसी पदासाठी तीन उमेदवारांमध्ये म्हणजेच वैशाली, बाप्पा आणि अभिजीत केळकर यांच्यात सिग्नेचर टाक्स रंगला. या टाक्समध्ये हिना पांचाळ संचालिका होती. या टास्कदरम्यानही वीणा आणि नेहा यांच्यात बाचाबाची झाली. मात्र अखेर वैशाली माडे टास्क जिंकत या आठवड्याची कॅप्टन ठरली. त्यानंतर काही स्पर्धकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही केला.