
Bigg Boss Marathi 2, Episode 23 Highlights: कालच्या भागात शिवानीची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी झाली आहे. घरातून शिवानी बाहेर पडली तर हीना पांचाळ या नर्तकीची Wild Card Entry झाली आहे. आता आजच्या भागात परत सदस्यांची शाळा घेणे चालू होते. सुरुवातीलाच वीणा तिचा बिचुकले यांच्यावर असलेला राग व्यक्त करते. मांजरेकर बिचुकले यांनी वापरलेल्या शिव्यांबद्दल त्यांना झापतात. परत वीणा त्यांना ‘फितूर’ म्हणून त्यांच्या वागण्याबद्दल राग व्यक्त करते, यावर बिचुकले वीणावर फार चिडतात.
यानंतर परागने कमोडमध्ये टाकलेल्या कणकेबद्दल महेश मांजरेकर राग व्यक्त करतात (या घटनेबद्दल सोशल मिडीयावर बरेच बोल लावले गेले होते). इथे वैशाली पराग कसा त्याचे विचार दुसऱ्यांवर थोपवतो याबाबात तिचा राग व्यक्त करते. बोलताना तिच्या बोलण्याची पातळी सुटते. त्यानंतर नेहा ज्याप्रकारे शिवचा त्याच्या भाषेवरून अपमान करते त्याबद्दल नेहाला समज दिली जाते. तसेच इतरांनाही कोणी कोणाच्या भाषेचा अपमान करू नये असे सांगितले जाते. परत वीणा आणि बिचुकले यांच्यातील भांडण उफाळून येते. इथे बिचुकले ‘माझी नोकरानी वीणापेक्षा सुंदर आहे’ असे वक्तव्य करून आपली पातळी दाखवून देतात’. त्यानंतर सुरेखा ताई आणि बिचुकले एकमेकांशी भिडतात. चेष्टेत सुरु झालेले या दोघांचे बोलणे भांडणामध्ये परावर्तीत होते.
त्यानंतर आजच्या ‘फादर्स डे’चे औचित्य साधून अभिजित केळकरला त्याच्या मुलांचा फोन येतो. अभिजित अतिशय भावूक होऊन त्यांच्याशी बोलतो. नंतर अभिजित बिचुकलेही त्याच्या मुलाशी बोलतात. यावेळी ते आपल्या मुलासोबत एक गाणेही गातात. त्यानंतर दिगंबरलाही त्याच्या मुलीचा फोन येतो. विद्याधर यांनाही त्यांच्या मुलाचा फोन येतो. रूपालीलाही तिच्या कुटुंबियांचा फोन येतो.
‘आरोपी कोण’ या टास्कसाठी एका दर्शकाला बोलावले जाते. ही दर्शक नेहाला तिने शिवच्या भाषेवरून केलेल्या टिपण्णीवरून तिला दोषी ठरवते. शिक्षा म्हणून तिला माफी मागायला सांगितले जाते. त्यानंतर फोनवरून एक दर्शक बिचुकले यांना त्यांचा पूर्वीचा खेळ परत सुरु करा असे सांगतो.
शेवटी दिगंबर नाईक या आठवड्यात घराबाहेर पडतो.