Bigg Boss Marathi 2, 15th June 2019 (Photo Credit : Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, Episode 22 Highlights: कालच्या भागात लक्झरी बजेटसाठी टास्क दिला गेला आहे, यादरम्यान टॉयलेटवरून झालेले भांडण आपण पाहिलेत. आजच्या भागाची सुरुवात होते काल पराग आणि किशोरी यांनी कमोडमध्ये टाकलेल्या कणकेबद्दलच्या चर्चेने. यामध्ये पुन्हा नेहा आणि पराग एकमेकांशी भिडतात. इथे नेहा अगदी ‘हाड’ असा उल्लेख करत परागचा अपमान करते. पुढे ती पराग आणि रुपालीच्या जवळकीचाही उद्धार करते. रात्री परागच्या वागण्याने चिडलेली वीणा मला या ग्रुपमध्ये राहायचे नसल्याचे रुपालीला सांगते. सोबत ती रूपालीला परागला सोडण्याचाही सल्ला देते.

शिवानी परत एकदा माईकशी बोलत, बिग बॉसला आपल्याला या घरातून बाहेर जायचे असल्याचे सांगते. या गोष्टीचे काय परिणाम होतील ते आपण भोगायला तयार असल्याचेही ती बोलते. जास्त वेळ न वाया घालवता कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याबद्दल ती बिग बॉसला सांगते.

रात्री पराग आणि वीणा सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलतात. इथे नेहाच्या चारित्र्याविषयी ही शंका घेतली जाते. नेहा आपल्याकडे आकर्षित असल्याचे पराग वीणाला सांगतो. अखेर महेश मांजरेकर यांची एन्ट्री होती. आल्या आल्याच ते शिवानीला विविध प्रश्न विचारून तिचा चांगलाच समाचार घेतात. तिने कायद्याचा केलेला उल्लेख, बाहेर येणे जाने याबाबत असलेले तिचे विचार यावर ते चिडतात. त्यावर शिवानी आक्रमक होऊन उत्तरे देते. त्यानंतर जे लोक शिवानीला बाहेर जाण्यापासून अडवत होते त्यांच्यावरही भडकतात. अखेर शिवानीला तिचा प्रॉब्लेम नक्की काय आहे असे विचारले जाते, यावर तिचे काहीही उत्तर नसते. शेवटी ती मी तितकी खंबीर नसल्याचे सांगते.

यावर वीणा आणि पराग, शिवानी सर्वांचे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करत असल्याचे सांगतात. तसेच तिच्या मूड स्विन्ग्जबद्दल ही नकारात्म बोलले जाते. अशाप्रकारे जवळजवळ सर्वच शिवानीच्या वाईट गुणांबद्दल बोलतात. त्यानंतर महेश मांजरेकर शिवानीच्या वृत्तीबद्दल तिच्या दृष्टीकोनाबद्दल तिच्यावर चिडतात. त्यालाही शिवानी उलट उत्तरे देते. अखेर शिवानीला तिचे समान घेऊन बाहेर जाण्याबद्दल सांगितले जाते. इकडे शिवानी तिचे सामान भरत असताना बिग बॉसच्या घरात पहिली Wild Card Entry होते, ती म्हणजे डान्सर, अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal).

(एकंदरच या मुलीची मराठीची फार मोठी समस्या आहेत. त्यात एकूणच तिचा व्यक्तिमत्व तितके प्रबळ वाटत नाही की ती या घरात टिकू शकेल. मात्र येणारे काही दिवसच ही गोष्ट ठरवतील. कदाचित ती आम्हाला चुकीचे ही सिद्ध करू शकते.)

दरम्यान महेश मांजरेकर सर्वांशी मस्ती करत असताना, बिग बॉस शिवानीला बाहेर जाण्याचा आदेश देतात. इकडे शिवानी घराबाहेर पडते आणि तिकडे हीना घरात प्रवेश करते. पराग नवीन आलेल्या हीनाला घरात आपले मित्र निवडण्यासाठी सल्ला देतो. त्यानंतर बिचुकले तिला घरातील सर्वांची ओळख करून देतात. अखेर शेवटी पराग सेफ असून बिचुकले अनसेफ असल्याचे सांगून आजचा एपिसोड संपतो.