Bigg Boss Marathi 2, 18 July, Episode 54 Updates: सांकेतिक खुनासाठी डबलबार होऊनही हिना पांचाळ सुखरुप; नेहा शितोळे, शिवानी सुर्वे यांचा निशाणा निकामी
Bigg Boss Marathi 2 Preview (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 18 July, Episode 54 Updates:  बिग बॉसच्या घरात बिग बॉसने स्पर्धकांवर मर्डर मिस्टी हे कार्य सोपवले आहे. हे कार्य करताना घरातील स्पर्धकांनीच घऱातील स्पर्थकांचा सांकेतिक खून करायचा आहे. आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या सुपाऱ्या मिळाल्या आहेत त्यापैकी बहुतेकांचे खुन झाले आहेत. पण, हिना पांचाळ, वीणा जगताप यांचे सांकेतिक खून मात्र घरातील खुन्यांना करता आले नाहीत. विशेष म्हणजे सांकेतिक खुनासाठी डबलबार होऊनही हिना पांचाळ सुखरुप ठरली.  हिना पांचाळ हिची सुपारी नेहा शितोळे हिने दोन वेळा आणि शिवानी  सुर्वे हिने एक वेळा दिली. त्यामुळे नेहाचा डबलबार आणि शिवानीचा सिंगल बार होऊनही हिना पांचाळ हिचा खुन (सांकेतिक)  झालाच नाही.

 नेहा शितोळे, शिवनी सुर्वे यांचा निशाणा निकामी

हिना पांचाळ हिचा खुन करण्यासाठी शिवानी सुर्वे ही खुनी होती. हिना पांचाळ हिचा खून करण्यासाठी तिला इमोशनल ब्लॅकमेल करुन रडवायचे होते. तिला रडविण्याची जबाबदारी शिवानी सुर्वे हिच्यावर होती. शिवानीने अनेक प्रयत्न केले. पण तिला हिना हिस काही रडवता आले नाही. त्यामुळे मर्डर मिस्ट्री या कार्यात हिना पांचाळ 'खल्लास' झाली नाही. म्हणजेच तिचा खून झाला नाही. नेहा शितोळे, शिवानी सुर्वे यांचा निशाणा निकामीच ठरला.

दरम्यान, मर्डर मिस्ट्रीय या कार्यात आज वैशाली माडे हिचा सांकेतिक खून झाला.  वैशालीचा सांकेतिक खून शिवानी सुर्वे हिने केला. हा खून करण्यासाठई वैशाली माडे हिची लाल रंगाची कोणतीही वस्तू शिवानी हिस अडगळीच्या खोलीत टाकायची होती. शिवानीने ही वस्तू अडगळीच्या खोलीत टाकली आणि वैशालीचा खून झाला. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 53 Updates: बिग बॉसच्या घरात सांकेतिक खुनासाठी सुपारी; स्पर्धकांमध्ये रंगली मर्डर मिस्ट्री)

प्रेमाने कापला गेमचा गळा;  मोहीम फत्ते करण्यास विश्वास आला आडवा

वीणा जगताप हिचा खून करण्याची जबाबदारी शिव ठाकरे याच्यावर होती. त्यासाठी वीणाचा एक शर्ट तिच्या नकळत उचलून तो फाडायचा होता. शिवने ती जबाबदारी 90 टक्के पार पाडली. शर्ट मिळवला. पण, विश्वासाला तडा जायला नको म्हणून त्याने तो शर्ट फाडण्यास नकार दिला. अखेर बिग बॉसने शिव ठाकरे यांची खुनी ही जबाबदारी काडून घेत त्याला सामान्य नागरिक केले. अखेर शिवानी सुर्वे हिने खुनी म्हणून मोहीम फत्ते केली आणि वीणाचा शर्ट फाडला. पण, गंमत अशी की वीणाचा शर्ट फाडल्यामुळे शिव ठाकरे याचा खून झाला. शिवचा खून करण्यासाठी शिवानी हिला वीणा जगताप हिचा शर्ट फाडायचा होता. जो तिने फाडला.