Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 53 Updates: अचानक आलेल्या बुरखाधारी लोकांनी बिग बॉसच्या घरातून अभिजित केळकर याचे नाट्यपूर्ण अपहरण केले. काय घडले हे न कळल्यामुळे घरातील सदस्यांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. पण, बिग बॉसने साप्ताहीक कार्यासाठी हे अपहरण घडवून आणले आहे. या अपहरणाच्या माध्यमातून बिग बॉसने घरातील सदस्यांवर 'मर्ड मिस्ट्री' हे कार्य सोपवले.
काय आहे मर्डर मिस्ट्री कार्य
बिग बॉसने घरातील सदस्यांवर मर्डर मिस्ट्री हे साप्ताहीक कार्य सोपवले आहे. या कार्याच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात होणार सांकेतीक खून घडवून आणले जाणार आहेत. खून झालेला सदस्य कॅप्टनसीच्या कार्यातून बाद होईल. तर, खून न झालेल्या सदस्यास कॅप्टनसीसाठी फायदा मिळू शकणार आहे. सर्वसामान्य नागरिक घराती सदस्याची सुपारी देतील. खून झालेल्या सदस्यांनी खल्लास असे लिहिलेल्या पाट्या गळ्यात घालून घरात फिरायचे आहे. खून झालेले सदस्य प्रतिस्पर्ध्याच्या खूनाची सुपारी देऊ शकतात.
अभिजित केळकर याच्यावर बिग बॉसने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
अभिजित केळकर याचे अपहरण करुन बिग बॉसने त्याच्यावर एक मोठी कामगिरी सोपवली आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांकडून अभिजित याने घरातीलच स्पर्धक खुन्यांकडून सहकारी स्पर्धकांचे सांकेतीक खून करायचे आहेत. त्यासाठी दोन खून्यांची निवडही करायची आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 Episode 53 Preview: बिग बॉसच्या घरावर मोठे संकट, पडणार सांकेतिक खून; जाणून घ्या काय आहे आजचे साप्ताहिक कार्य)
..आणि बिग बॉसच्या घरात झाला पहिला सांकेतिक खून
माधव देवचक्के यांने सांकेतिक खुनासाठी किशोरी शहाणे याची सुपारी दिली. तर, नेहा शितोळे हिने हिना पांचाळ हिची निवड सांकेतिक खुनासाठी सुपारी दिली. यावर अभिजित केळकर याने शिव ठाकरे याच्या हातून किशोरी शहाणे यांचा सांकेतिक खून घडवून आणला. आता किशोरी शहाणे बिग बॉसच्या घरात 'खल्लास' अशी पाटी गळ्यात अडकवून फिरत आहेत.