बिग बॉसच्या घरातील वातावरण होणार आणखी गरम; एन्ट्री करत आहे ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Watch Video)
शेफाली जरीवाला (Photo Credit : Instagram)

बिग बॉसचे 13 वे पर्व (Bigg Boss Season 13) आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचले आहे. या पर्वातील सर्वच सदस्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. आता काही नवीन सदस्य बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी तयार झाले आहेत. यामध्ये आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करत आहे ती ‘कांटा लगा’ गर्ल (Kaanta laga Girl), शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) . कलर्सने नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये शेफाली आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र शेफाली नक्की काय म्हणून घरात प्रवेश करत आहे हे आजच्या भागातच समजेल.

नुकत्याच पार पडलेल्या वीकएंडचा वारमध्ये घरातून कोणताही सदस्य बाहेर पडला नाही. त्यानंतर कालच्या भागात अचानक सिद्धार्थ डे घराबाहेर पडला. आता येत्या आठवड्यात घरात नवीन सदस्यांची एन्ट्री होणार आहे. यामध्ये तहसिन पूनावाला, हिंदुस्थानी भाऊ आणि खेसारीलाल यादव यांचा समावेश आहे. सलमान खानने या तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची ओळखही करून दिली आहे. मात्र आज रात्री आणखी एक सेलिब्रिटी घरात प्रवेश करणार आहे. ही सेलेब्रिटी आहे ‘कांटा लगा’ गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेली शेफाली जरीवाला. (Bigg Boss 13: मुले-मुली एकाच बेडवर झोपत असल्याने करणी सेना आक्रमक; शो बंद करण्याची केली मागणी)

प्रोमोमध्ये शेफाली सिक्रेट रूममधून कुटुंबातील सर्व सदस्यांवर लक्ष ठेवताना दिसत आहे. शेफाली सिक्रेट रूममधून घरातील सदस्यांकडे पहाटे आणि म्हणते - घरात दोन गट पडले आहेत, मात्र एका आठवड्यात हे सर्व चित्र बदलेल. शोमध्ये शेफाली जरीवालाच्या एन्ट्रीनंतर ग्लॅमरसह तिचे नृत्य कौशल्यही बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तब्बल 17 वर्षानंतर शेफालीला असे पुन्हा पाहण्यासाठी तिचे चाहते अतिशय उत्साहित आहेत.