सिद्धार्थ डे ने nomination च्या वेळी दलजितच्या मुलाचे नाव घेतले होते. आणि म्हणूनच दलजितने सर्वांसमोर सिद्धार्थला धमकी दिली कि या पुढे माझ्या मुलाचं नाव कोणी घेतलं तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. अखेर सिद्धार्थने दलजितची सर्वांसमोर माफी मागितली.  

 बिग बॉसने अबू आणि आसिम या दोघांना देबोलीना आणि कोयना या दोघींमधील एकीला nominate करायचा विशेष अधिकार दिला. दोघींनी आपली मते मंडळी. परंतु अबू आणि आसिम यांनी एकत्रित रित्या निर्णय घेत कोयना मित्राला nominate केले.

सिद्धार्थ डे च्या हातात होता दलजित आणि शेफालीच्या nomination चा निर्णय. पण सिद्धार्थने दलजितच्या मुलाचा विषय काढला आणि दोघांमध्ये सुरु झालं वाद. अखेर सिद्धार्थने दलजितला केले nominate

रश्मी आणि आरती दोघी घरात राहण्याचं आपलं कारण सिद्धार्थ शुक्लला पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण तरीही सिद्धार्थने रश्मीला nominate केले आणि आरती safe ठेवले.

घरातील सर्व सदस्य शेहनाज आणि पारस मधील equation वर चर्चा करत आहेत. शेहनाजला nominate करताच पारसला आले रडू.

नॉमिनेशन प्रक्रियेला होत आहे सुरुवात. माहीराने व्यक्त केल्या पारस समोर आपल्या भावना. दुसरीकडे शेहनाजने पारसला सांगितलं कि मी अजिबात विश्वासू नाही. अखेर पारसने शेहनाजला केले nominate.

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ल मध्ये kitchen politics. दोघांमध्ये पडली वादाची ठिणगी. जेवण कसं बनवावं या वरून एपिसोडच्या सुरवातीलाच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण.

Nominations ची window आज उघडणार. कोण होईल safe तर कोण होईल nominate? कळेल थोड्याच वेळात...

Bigg Boss 13 च्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात होणार आहे. काळ झालेल्या Weekend Ka Vaar एपिसोडमध्ये हीना खान हिच्या स्पेशल एन्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यासोबतच सलमान खान घरातील सर्वच स्पर्धकांसोबत मजेशीर खेळ खेळाला. हे खेळ खेळताना काहींचे खटके उडाले तर काहीजण इमोशलसुद्धा झाले.

पण आजच्या भागात रंगणार आहे नॉमिनेशनचा अनोखा खेळ. त्यासाठी नॉमिनेशन विंडो आज उघडणार आहे ज्यामध्ये मुलींनी घरातील मुलांना आपण घरात राहण्यास का लायक आहोत हे पटवून द्यायचे आहे तर मुलांनी 2 पैकी एका मुलीला nominate करायचे आहे तर एकीला safe करायचे आहे.

तर बघूया आजच्या भागात कोण होईल safe तर कोण होईल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी nominate?