Bigg Boss 12 : अनूप जलोटांची महिन्याभराची कमाई ऐकून थक्क व्हाल...
अनूप जलोटा (Photo Credit: Twitter)

बिग बॉस 12 च्या घरातील अनूप जलोटांची एन्ट्री फारच गाजली. 37 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड जसलीन मथारुसोबतच्या रिलेशनशीपमुळे ते सध्या चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात ते सर्वाधिक मानधन घेणारे व्यक्ती आहेत. पण भजन गायक अनूप जलोटा यांची कमाई थक्क करणारी आहे. इतके आहे अनूपजींचे बिग बॉसच्या घरातील मानधन.

आपल्या आवाजामुळे लोकप्रिय असलेले अनूप जलोटा बिग बॉसमध्ये आल्यापासून तरुणांमध्येही फार लोकप्रिय झाले आहेत. आता तर गर्लफ्रेंड जसलीन मथारु सोबतचे रिलेशनशीप चर्चेचा विषय ठरत आहे.

भारतातील परफॉर्मन्स

भारतात परफॉर्मन्ससाठी अनूप जलोटा 8 ते 10 लाख रुपये मानधन घेतात. कॉन्सर्ट 45 मिनिटे ते तासभर चालते. टीममध्ये सहाजण असतात. त्यापैकी ५ जण म्युझिशियन आणि एक महिला गायिका असते. भारतात ते महिन्याभरात 12 ते 15 कॉन्सर्ट करतात. यावरुन त्यांची महिन्याची कमाई 20 लाख ते 1 कोटींच्या घरात जाते.

इंटरनॅशनल परफॉर्मन्स

इंटरनॅशनल परफॉर्मन्ससाठी अनूप जलोटा 15 ते 16 लाख रुपये घेतात. ते महिन्यातून तीन ते चार इंटरनॅशनल कॉन्सर्ट करतात. परदेशातील भारतीयांमध्ये अनूप जलोटा फार लोकप्रिय आहेत. इंटरनॅशनल कॉन्सर्टमधून महिन्याला ते 60 लाखांची कमाई करतात.

27 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत त्यांची एक कॉन्सर्ट होती. पण अनूपजी बिग बॉसच्या घरात असल्यामुळे कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.