Bigg Boss 12 : जसलीनने सर्वांसमोर केले अनूपजींना किस ; व्हिडिओ व्हायरल
अनूपजींना किस करताना जसलीन (Photo Credit : Instagram)

बिग बॉस 12 च्या सीजनला अलिकडेच सुरुवात झाली. पण भजन गायक अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु चांगलेच चर्चेत आहेत. जसलीन अनूप जलोटांपेक्षा 37 वर्षांनी लहान असल्याने या दोघांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राखीचा अनुपजींना सल्ला, 'हे' कांड करा नाही तर हाती फक्त 'लोटा'च शिल्लक राहील (व्हिडिओ)

आता पुन्हा एकदा हे दोघं चर्चेचा विषय बनले आहेत. जसलीनने 65 वर्षीय बॉयफ्रेंड अनूप जलोटा यांना किस केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस 12 : ...जेव्हा अनूप जलोटा 'बेबी डॉल' गातात !

''मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, पण तुम्ही नाही म्हणायचे नाही,'' असं म्हणत जसलीन अनूपजी उभे असतात त्या ठिकाणी येते आणि इतर स्पर्धकांसमोर त्यांना किस करते.

जसलीनच्या या गोड सरप्राईजमुळे जलोटाजी देखील भयंकर खूश होतात. त्यांचे आनंदी भाव व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतात. कोण आहे अनूप जलोटांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु ?

पाहा हा खास व्हिडिओ...

सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या हटके कपलचा बिग बॉसमधील पुढील प्रवास कसा असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिग बॉस १२ च्या घरात अनूप जलोटा घेणार सर्वाधिक मानधन