Mandar Chandwadkar On Asit Modi: असित मोदींच्या समर्थनार्थ भिडे मास्तर आले धावून; म्हणाले- पुरुषांचे वर्चस्व असते तर तारक मेहता 15 वर्षे चालले नसते
Mandar Chandwadkar And Asit Modi (Photo Credit - Twitter)

सोनी सब टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) या कार्यक्रमाभोवती सुरू असलेले वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. या शोला अलविदा करणाऱ्या काही कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) आणि त्यांच्या टीमवर अनेक आरोप केले आहेत. अलीकडेच या मालिकेत रोशनची भूमिका करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने निर्माता आणि प्रॉडक्शन टीमच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, आता या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांनी या संपूर्ण प्रकरणावर उघडपणे भाष्य केले आहे.

असित मोदीं आदर्श कौटुंबिक माणूस

मंदार म्हणतात, “मी असित मोदींना उत्तम निर्माता मानतो. ते एक आदर्श कौटुंबिक माणूस आहे. त्याच्यासारखे चांगले निर्माते सापडत नाहीत. ते एक सरळ माणूस आहे ज्यांचा देवावर विश्वास आहे, ज्यामुळे हा शो इतका काळ चालला आहे. जर या सेटवर फक्त पुरुषांचे वर्चस्व असते, पुरुषी अराजकतावादी वृत्ती असती, तर हा शो 15 वर्षे चालू शकला नसता. (हे देखील वाचा: Bigg Boss OTT 2 Update: बिग बॉस ओटीटी 2 मधून karan johar ला दाखवला बाहेरचा रस्ता; 'हा' सुपरस्टार करणार होस्ट)

मी खुप दु:खही आहे

मंदार पुढे म्हणाला की, "मला आश्चर्यही वाटत आहे आणि खूप दुःखही आहे की असे आरोप का केले जात आहेत आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर असे का बोलले जात आहे." तसेच मंदार चांदवडकर पुढे म्हणतात की, “अनेक वर्षे मालिकेत काम करणाऱ्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. मतभिन्नतेमुळे आपापसात वाद होऊ शकतात पण असे आरोप लावता येत नाहीत.