Bigg Boss OTT 2 Update: बिग बॉस ओटीटी 2 मधून karan johar ला दाखवला बाहेरचा रस्ता; 'हा' सुपरस्टार करणार होस्ट
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती, पण शमिता शेट्टी, राकेश बापट, झीशान खान, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन या स्पर्धकांनी आपल्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली.
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) यशामध्ये अभिनेता सलमान खानचा (Salman khan) मोठा हात आहे. हा शो सलमानला होस्टिंग करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आतुर असतात. परंतु 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी बिग बॉस ओटीटीची कमान जेव्हा करण जोहरच्या हातात दिली, तेव्हा सलमानच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला होता.
'बिग बॉस ओटीटी'चा पहिला सीझन हिट ठरल्यानंतर आता पुन्हा एकदा 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वाची चर्चा सुरु आहे. यात एक बातमी अशी समोर येत आहे, ज्यामुळे सलमानचे चाहते खूश होतील, तर करण जोहरच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.
वृत्तानुसार, 'बिग बॉस ओटीटी'च्या निर्मात्यांनी शोचा दुसरा सीझन होस्ट करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला नियुक्त केले आहे. 'बिग बॉस' ओटीटीचा पहिला सिझन 2021 मध्ये प्रसारित झाला होता. त्याला मिळालेले मोठे यश पाहता, 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चा फॉरमॅटदेखील पहिल्या सिझनप्रमाणे असेल. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला शोचा प्रीमियर होण्याची अपेक्षा आहे. हा शो तीन महिने चालणार आहे आणि वूटवर प्रसारित केला जाईल.
(हेही वाचा: Parineeti-Raghav Engagement: परिणीती राघव चढ्ढासोबतच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला रवाना, या दिवशी होणार कार्यक्रम)
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती, पण शमिता शेट्टी, राकेश बापट, झीशान खान, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन या स्पर्धकांनी आपल्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली. 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनसाठी अनेक स्टार्सची नावे समोर येत आहेत. काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की मुनवर फारुकी, अर्चना गौतमचा भाऊ गुलशन या रिअॅलिटी शोमध्ये दिसू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

