अभिनेत्री Bhagyaashreee Mote च्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू; कुटुंबियांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता
Bhagyashree Mote With Sister | Instagram

पुण्यामध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyaashreee Mote) हीची बहीण मधू मार्कंडेय (Madhu Markandey) मृतावस्थेमध्ये आढळली आहे. मधू मार्कंडेयचा संशयास्पद झालेला मृत्यू हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मृत मधू मार्कंडेय च्या चेहर्‍यावर काही जखमा आढळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी वाकड पोलिस (Wakad Police) तपास करत आहेत.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करत होती. व्यवसाय मोठा करण्यासाठी ती आणि तिची मैत्रिण रविवारी भाड्याने घर पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे मधूला चक्कर आली आणि ती कोसळली. त्यानंतर मधूला मैत्रिणीने खाजगी रूग्णालयामध्ये दाखल केले. पण तेथून हॉस्पिटलने तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मधूला तेथे मृत घोषित करण्यात आले. वाकड पोलिसांनी मधूचा मृत्यू अकस्मात मृत्यू असल्याचं म्हटलं आहे. यावेळी तिच्या शरीरावर कोणतीही गंभीर आढळली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

पहा भाग्यश्री मोटेची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

मधूच्या पतीचं 15 दिवसांपूर्वीक निधन झालं आहे. पतीच्या पश्चात ती 2 मुलांसह राहाटणी मध्ये राहत होती. ती ज्या मैत्रिणीसोबत गेली होती ती आम्हांला ठाऊक नव्हती असं तिच्या परिवाराकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावरूनही तिच्या कुटुंबियांनी मधूच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

बहिणीच्या निधनानंतर भाग्यश्रीने तिच्यासोबतचे काही फोटो पोस्ट करत भाविक संदेश देखील लिहला आहे.