आशुतोष पत्की कडून तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'स्पेशल  पोस्ट' आणि 2 खास टीप्स; चाहत्यांमध्ये 'डेटिंग'ची चर्चा
तेजश्री प्रधान। PhotoCredits: Instagram/ Ashutosh Patki

अग बाई सासूबाई मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली शुभ्रा-सोहमची जोडी अनेक प्रेक्षक ऑनस्क्रीन मिस करत आहेत. पण कालच या मालिकेची नायिका अर्थात तेजश्री प्रधानच्या(Tejashree Pradhan) बर्थ डे निमित्ताने तिच्या चाहत्यांना ऑफस्क्रिन तेजश्री- आशुतोष यांच्या जोडीचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. मालिकेतला 'सोहम' अर्थात आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) तेजश्रीसाठी एक खास पोस्ट लिहित बर्थ डे निमित्ताने 2 टीप्स देखील दिल्या आहेत. सध्या आशुतोष पत्कीच्या याच पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. या पोस्टमध्ये आशुतोषने तेजश्रीला मैत्रिण म्हणून उत्तम को अ‍ॅक्टर म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिला भूतकाळ विसरण्याचा सल्ला देखील दिला आहे. नक्की वाचा: 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील सोहम नेमका आहे तरी कोण?

आशुतोषने तेजश्री सोबतचा फोटो पोस्ट करत लिहलेल्या या स्पेशल बर्थ डे पोस्ट मुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये 'डेटिंग' ची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान एका युजर ने 'आम्ही लवकरच काही बातमीची अपेक्षा' करू शकतो का? असा सवाल पोस्ट केला आहे. तर इतर कमेंट्समध्ये तेजश्री आणि आशुतोषच्या जोडीला शुभेच्छा देत त्यांना लग्न करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान आशुतोषच्या 2 टीप्समध्ये एकतर तिला भूतकाळ विसरण्याचा सल्ला आहे आणि दुसरी टीप ही आशुतोष तिला 'प्रेझेंट' देणार नाही त्यामुळे ते विसर असं तो म्हणाला आहे. यावर तेजश्रीनेही रिप्लाय देत बाकी ठीक आहे पण 'प्रेझेंट' नाही असं चालू शकत नाही असा रिप्लाय दिला आहे.

तेजश्री प्रधान खरी घराघरात पोहचली ती म्हणजे 'होणार सून मी या घरची' मालिकेमधून. ही मालिका रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतली होती. या मालिकेत तेजश्री आणि शशांक केतकर यांच्याभोवती मालिका होती. आणि हीच जोडी वास्तवातही त्याच काळात विवाहबंधनात अडकली होती. पण वर्षभरातच त्यांचं बिनसलं आणि ते विभक्त झाले. पुढे शशांक त्याच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात अडकला काही महिन्यांपूर्वी त्याला मुलगा झाला आहे. तर तेजश्री सध्या सिंगल आहे.