अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या दुस-या पतीला अटक, मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप
Shweta Tiwari And Abhinav (Photo credits: Instagram)

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली आहे. तिचा दुसरा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) याने तिची मुलगी पलक हिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन अभिनव कोहलीला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. पलक (Palak) ही श्वेता च्या पहिल्या पतीची म्हणजेच राजा चौधरीची मुलगी आहे.

श्वेताच्या तक्रारीनुसार, अभिनव कायमच दारुच्या नशेत असतो. 11 ऑगस्टला रात्री त्याने दारूच्या नशेत पलकला म्हणजेच त्याच्या सावत्र मुलीला मारहाण तसेच शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंगही केल्याचा आरोप श्वेता तिवारीने केला आहे. श्वेता तिवारीच्या तक्रारीनुसार, समतानगर पोलिसांनी अभिनव ला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा- दिल्ली: आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीचा रेल्वे प्रवासावेळी विनयभंग

'जान क्या बात है' या मालिकेदरम्यान अभिनव आणि श्वेताची ओळख झाली. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी 13 जुलै 2013 रोजी लग्न देखील केली. त्यांना रेयांश हा मुलगाही आहे. श्वेता, अभिनव, पलक आणि रेयांश असे त्यांचे हसतखेळतं कुटूंब होते. मात्र मागील 1 वर्षापासून त्यांच्यात अनेक वाद होत होते.

याआधी श्वेताचा पहिला पती राजा चौधरीही तिला दारुच्या नशेत मारहाण करायचा. त्यामुळे तिने राजासोबत 2007 साली घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटानंतर पलक तिच्या आईसोबत म्हणजेच श्वेतासोबत राहत होती.