Abhishek Chatterjee (PC- Facebook)

Abhishek Chatterjee Passes Away: मनोरंजन क्षेत्रातून पुन्हा एकदा अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatterjee) यांचे निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. वृत्तांनुसार अभिषेकला हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. अभिषेक चॅटर्जीने प्रोसेनजीत चॅटर्जी आणि संध्या मुखर्जी यांच्यासोबत चित्रपट प्रवास सुरू केला होता.

रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शूटिंग सेटवर होता. त्यावेळी त्याची प्रकृती खालावली. हे पाहून तेथील क्रू मेंबर्संनी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. मात्र, अभिनेता हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हता. प्रकृती चिंताजनक पाहून त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून अभिषेकवर उपचार केले. मात्र रात्री उशिरा त्याने अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा - Swatantra Veer Savarkar: महेश मांजरेकर यांच्या "Swatantra Veer Savarkar" या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा साकारणार विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका)

अभिनेत्याच्या निधनानंतर, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'अभिषेक चॅटर्जीच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. अभिषेक त्याच्या अभिनयात प्रतिभावान आणि अष्टपैलू होता. आम्हाला त्याची आठवण येईल. हे टीव्ही मालिका आणि आमच्या चित्रपट उद्योगाचे खूप मोठे नुकसान आहे, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती मी शोक व्यक्त करते.'

दरम्यान, अभिषेक चॅटर्जी बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, टीव्हीच्या दुनियेत त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अभिषेकने तरुण मजुमदार दिग्दर्शित 'पथभोला' (1986) या बंगाली चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.