Singham Againn PC INSTA

Singham Again: रोहित शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेनचा ट्रेलर ७ ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. हा ट्रेलर लॉंन्च नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) मुंबई येथे होणार आहे. हा चित्रपट अजय देवगणच्या पॉवरफूल कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहे. (हेही वाचा- प्रियंका चोप्रा निर्मित, आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी'; येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दिपीका पदुकोण आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसणार आहे. दिपीका या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर लॉन्च कार्यक्रम NMACC च्या 2,000 आसनांच्या मोठ्या सभागृहात आयोजित केला जाईल, जिथे मीडिया तसेच चित्रपटाच्या चाहत्यांचा समावेश असेल.

अजय देवगण आणि दिपीका पदुकोण सोबतच करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग देखील या चित्रपटात झळकणार आहे. सिंघम अगेन १ नोव्हेंरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून त्यांची स्पर्धा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'शी होणार आहे. दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी आतुरता दाखवली आहे. चित्रपटगृहात कोणाता चित्रपट चालेल याची समिक्षकांना उत्सुकता लागली आहे.