बॉलिवूड अभिनेत इरफान (Irrfan Khan) खान यांच्या निधनाने सर्वांनाचा धक्का लागला आहे. इरफान खान याचं निधन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अगदी त्याच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या. यामध्येच इरफान खान याची पत्नी सुतापा सिकदर (Sutapa Sikdar) हिने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच मी काही गमावले नाही तर, खूप काही मिळवले आहे..., असे त्या फोटोला कॅप्शन दिले आहे. त्यानंतर अनेकांनी सुतापााच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या धैर्याला सलाम केले आहे. तसेच सुतापाने फेसबूक अकाऊंटवरचा डिस्प्ले फोटो बदलत त्या ठिकाणी इरफानसोबतचा सुंदर फोटो ठेवला आहे.

दरम्यान, इरफान खान आजारी असताना त्याच्या प्रत्येक पावलावर सुतापाने त्याची साथ दिली आहे. मुलाखतीत बोलत असतानाही त्याने वारंवार या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख केला होता. इरफान आणि सुतापा यांनी 1995 मध्ये लग्न केले होते. सध्या इरफानच्या पश्चात त्याची पत्नी सुतापा, दोन मुले बाबिल आणि अयान आहेत. इरफान खान याने 29 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कर्करोगासारख्या असाध्य रोगावर मात करत तो भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करेल असा विश्वास साऱ्यांनाच होता. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. हे देखील वाचा- तन्मय वेकरिया आणि सोनालिका जोशी यांच्या नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कलाकार अझर शेख राहत असलेली इमारत सील; इमारती मधील 45 वर्षीय व्यक्ती कोविड 19 पॉझिटीव्ह

सुतापा सिकदरच इन्स्टाग्राम पोस्ट-

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने मार्च 2018 मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्याने सर्व कामे थांबवली होती. त्यानंतर इमरान खान उपचारासाठी लंडनला निगून गेला होता. इरफान खानने कॅन्सरवर मात केली असून उपचारानंतर सप्टेंबर 2019 मध्ये लंडनहून भारतात परतला होता. मात्र, आज सकाळी अचानक त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला मुंबई येथील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, 29 एप्रिल रोजी उपचार दरम्यान इरफान खानचा मृत्यू झाला.