तन्मय वेकरिया आणि सोनालिका जोशी यांच्या नंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कलाकार अझर शेख राहत असलेली इमारत सील; इमारती मधील 45 वर्षीय व्यक्ती कोविड 19 पॉझिटीव्ह
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Azhar Shaikh (Photo Credits: Instagram)

भारतात कोरोना व्हायरसचे संकट दाहक रुप धारण करु लागले आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी मुंबईत रुग्णसंख्या अधिक असून ती सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्ण आढळलेली ठिकाणं खबरदारी म्हणून सील करण्यात येत आहेत. दरम्यान तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील अभिनेता अझर शेख (Azhar Shaikh) राहत असलेल्या इमारतीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने इमारत सील करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, अझर शेखच्या इमारतीत एका 45 वर्षीय व्यक्ती कोविड 19 पॉझिटीव्ह आढळला आहे. अभिनेता अझर शेख मालिकेत पिंकू ही भूमिका साकारत आहे. ('तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील माधवी भिडे उर्फ सोनालिका जोशी यांच्या बिल्डिंग मध्ये आढळला कोरोना रुग्ण; BMC कडून इमारत सील)

एका वेबपोर्टलला माहिती देताना पिंकू म्हणाला की, "गेला आठवडाभरापासून मी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी देखील घराबाहेर पडलो नाही. आमच्या इमारतीत एक 45 वर्षीय गृहस्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने त्यांना जवळच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. माझी रहिवासी इमारत Wockhardt Hospital जवळ आहे. त्यामुळे आम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे."

पुढे तो म्हणाला की, "आमच्या घरातील कोणीही घराबाहेर पडत नसून आम्ही सर्व आवश्यक वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर देतो. मात्र माझे वडील पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांना कामासाठी दररोज घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे आम्हाला त्यांची जास्त काळजी वाटते. ते दररोज सकाळी 7 वाजता घरातून निघतात मात्र त्यांची परतण्याची वेळ निश्चित नसते." (तारक मेहता का उल्टा चश्मा फेम तन्मय वेकारिया राहत असलेली इमारत सील; सोसायटीत आढळले 3 COVID-19 पॉझिटीव्ह रुग्ण)

यापूर्वी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील कलाकार तन्मय वेकरिया राहत असलेली इमारत सील करण्यात आली होती. या इमारतीत 3 रहिवासी आणि एक भाजीविक्रेता यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. तसंच मालिकेत माधवी ही भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशी यांची इमारतही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सील करण्यात आली होती.