'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील माधवी भिडे उर्फ सोनालिका जोशी यांच्या बिल्डिंग मध्ये आढळला कोरोना रुग्ण; BMC कडून इमारत सील
Sonalika Joshi (Photo Credits: YouTube)

सब टीव्ही (SAB Tv) वरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उलटा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मध्ये माधवी भिडे (Madhavi Bhide) हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनालीका जोशी (Sonalika Joshi) यांच्या राहत्या बिल्डिंग मध्ये कोरोनाचा रुग्ण (Coronavirus Patient) आढळल्याचे समजत आहे, यानंतर मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांकडून (Mumbai Police) ही इमारत सील करण्यात आली आहे. स्पॉटबॉय या वेबसाइटशी बोलताना स्वतः सोनालीका यांनी या वृत्ताचे पुष्टी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ही संपूर्ण कारवाई 27 मार्च रोजीच करण्यात आली आहे. मागील कित्येक दिवस बिल्डिंग सील करण्यात आल्याने म्हणजेच इमारतीमधील कोणालाही बाहेर पडता येत नाही तर अन्य कोणाही व्यक्तीला बाहेरून आत येता नाही अशा परिस्थितीत रहिवाशांसाठी बिल्डींच्या गेटजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले.

सोनालिका यांच्या आधी सुद्धा तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत बाघा ही भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारिया याच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते, मुंबईतील कांदिवली येथील त्याची राहती बिल्डींग यामुळे सील करण्यात आली होती. दरम्यान, तन्मय याची इमारत केवळ 14 दिवसांसाठीच सील करण्यात आली होती याकाळात मुंबई पोलीस आणि पालिका कर्मचाऱयांनी बरेच सहकार्य केल्याचे तन्मय यांनी बोलून दाखवले होते.

यापूर्वी सुद्धा जयवंत वाडकर, अंकिता लोखंडे, साक्षी तनवार, सुशांत सिंह या कलाकारांच्या बिल्डिंग मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. लॉक डाऊन काळात चित्रीकरण बंद असल्याने आता ३० एप्रिल पर्यंत हे सर्व कलाकार आपापल्या घरात अडकून पडले आहेत. दुसरीकडे महाराष्टारील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसागणिक वाढतच आहे. सद्य घडीला राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे.