Smita Patil / PC: Instagram

स्मिता पाटील (Smita Patil) या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये संपूर्ण नव्या पर्वाची सुरूवात केली. भारतीय सिनेमांमध्ये फिमेल लीड च्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवली. अभिनयातील तिच्या सहजतेची, सौंदर्यांची तोड नाही. स्मिता पाटील यांनी हिंदी सिनेमांसोबतच बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम सिनेमांमध्येही काम केले आहे. स्मिता पाटील यांचा जन्म 17ऑक्टोबर 1955 साली पुण्यात झाला. एका राजकीय कुटुंबात जन्माला आलेल्या स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होते. सिनेमामध्ये येण्यापूर्वी त्यांनी रंगभूमी देखील गाजवली आहे. वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीचा प्रवास पहा कसा होता?

स्मिता पाटील यांच्याबद्दल काही खास गोष्टी

  • स्मिता पाटील यांचा सिनेमामध्ये प्रवेश 1975 साली श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' सिनेमामधून झाला.
  • बॉलिवूड मध्ये झळकण्यापूर्वी त्यांनी मराठी सिनेमा 'सामना' केला होता. त्यानंतर हिंदी सिनेमा 'मेरे साथ चल' केला होता.
  • स्मिता पाटील या स्त्रीवादी होत्या. त्यांनी महिलांच्या प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातूनही वाचा फोडली होती. भारतीय सामान्य घरातील महिला अशाच भुमिकांमध्ये त्या अधिक झळकल्या होत्या.
  • स्मिता पाटील यांची अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील घनिष्ठ संबंध होते. अनेकदा त्या बच्चन यांच्या घरी महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित असत.
  • B Subhash यांचा सिनेमा करत असताना स्मिता पाटील या गरोदर होत्या. त्यांच्यासाठी स्क्रिप्टमध्ये बदलही करण्यात आले होते.
  • राज बब्बर यांचे Nadira Zaheer यांच्या लग्न झाले असताना ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. 1986 साली स्मिता पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर राज बब्बर पुन्हा नदिरा यांच्याकडे गेले. त्यांना आर्या आणि जुही अशा दोन मुली आहेत.
  • वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी प्रतिक बब्बरला जन्म दिल्यानंतर 6 दिवसांतच स्मिता यांचा मृत्यू झाला.
  • स्मिता पाटील यांना राजकुमार यांच्याप्रमाणे झोपून मेकअप करायचा होता पण त्यांच्या मेकअप आर्टिस्टने त्यांना यासाठी नकार दिला. पण मृत्यूनंतर अंतिम निरोप देण्यापूर्वी ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यात आली होती आणि अगदी वधूप्रमाणे नटवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला होता.

नक्की वाचा: Smita Patil Birth Anniversary: जाणून घ्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या काही आठवणीतल्या गोष्टी.

स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2012 पासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव देखील त्यांच्या आठवणीमध्ये भरवला जातो.