Seema Deo | Wikipedia

ज्येष्ठ अभिनेत्री आणि रमेश देव यांच्या पत्नी सीमा देव (Seema Deo) यांचे निधन झाले आहे. सीमा देव 81 वर्षाच्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री सीमा देव या अल्झायमरच्या आजाराने (Alzheimer's disease) त्रस्त होत्या. आज (24 ऑगस्ट) सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे. अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सीमा देव रसिकांच्या भेटीला आल्या होत्या. रमेश देव आणि सीमा देव ही जोडी मराठी, हिंदी सिनेक्षेत्रात खूप गाजली. रमेश देव यांचे 2 फेब्रुवारी 2022 मध्ये निधन झाल्यानंतर आता दीड वर्षांंतच सीमा देव यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. आज संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क परिसरामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  नक्की वाचा: Seema Deo Health Update: Alzheimer शी लढत असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारासाठी लेक अजिंक्य देव यांनी केलं चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन; जाणून घ्या नेमका हा आजार काय? 

सीमा देव या आनंद, जेता, सरस्वतीचंद्र सारख्या सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आल्या होत्या. . ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.  सीमा देव यांनी मराठी, हिंदी मिळून 80 पेक्षा जास्त सिनेमांत काम केले आहे. 'मोलकरीण' सिनेमातील सीमा देव यांच्यावर चित्रित झालेलं कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर... हे गाणं खूप गाजलं.  मात्र काही वर्षापासून त्या अल्झायमर आजारामुळे सिनेक्षेत्रापासून दूर गेल्या होत्या. सीमा देव आणि रमेश देव यांच्या पश्चात त्यांची मुलं अजिंक्य देव आणि अभिनय देव कलाक्षेत्रात त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. नक्की वाचा: Girish Oak यांनी वडील रत्नाकर ओक यांच्या निधनावर शेअर केली भावूक पोस्ट.

सीमा देव यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांचा जन्म मुंबई मधील गिरगाव येथील आहे. अभिनय क्षेत्रात छाप पाडलेली ही जोडी रसिकांच्या गळ्यातील ताईत होती. 2013 मध्ये सीमा देव-रमेश देव यांच्या 50 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन आयोजित करत पुन्हा लग्न लावण्यात आले होते.