लवकरच 'दबंग खान'ची पुन्हा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर एंन्ट्री होणार
सलमान खान (फोटो सौजन्य - फाइल इमेज)

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान लवकरच बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तसेच दबंग, दबंग-3 आणि आता दबंग-3 या चित्रपटाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी दबंग-3 मध्ये काय पाहायला मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

"जॅक अँड दिल" या चित्रपटाच्या एका कार्यक्रमाच्या वेळी अरबाज खानने दबंग-3 चा खुलासा केला आहे. तसेच हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र सलमान त्याच्या अन्य चित्रपटांच्या शूटींगमध्ये वस्त असल्याचे दबंग-3 चे शूट पूर्ण झाले नसल्याचे त्याने सांगितले आहे.

त्यामुळे या चित्रपटाचे शूटींग येत्या मार्च, 2019 पर्यंत होणार आहे. तसेच या चित्रपटासंदर्भातील गोष्टींची संपूर्ण तयारी झाली असल्याचे अरबाज खानने सांगितले आहे.