सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांचे प्रेम एवढे उफाळले की, 'पेटा' प्रदर्शित झाल्यानंतर चक्क सिनेमागृहात केले लग्न
रजनीकांतच्या चाहत्यांचे लग्न (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सुपरस्टार रजनीकांत(Superstar Rajinikanth)यांचा पेटा (Petta) चित्रपट गुरुवारी (9 जानेवारी) सर्व सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहण्यासाठी मिळाला. पूर्वीसारखीच रजनीकांतच्या चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. आजचा दिवस रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एका सणसारखा आहे. काही ठिकाणी तर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली आणि ढोल ताशांच्या तालावर नाचगाणेसुद्धा चाहत्यांनी केले. परंतु एका जोडप्याने तर रजनीकांतवरील प्रेमाच्या वेडेपणाची हद्दच पार केली आहे. या जोडप्याने असे काही केले की ज्यावर विश्वास ही ठेवणे अश्यक होईल.

रजनीकांतच्या दोन चाहत्यांनी चक्क सिनेमागृहातच लग्न केले आहे. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर पाहा या व्हिडिओतील भटजी या जोडप्याने लग्न कसे लावून देत आहेत.

पेटा चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त विजय सेथुपथी, तृषा कृष्णनन, शशिकुमार आणि सिमरन बॉवी हे कलाकार मुख्य भुमिका साकारणार आहेत. तर नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटातून नकारत्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.