सुपरस्टार रजनीकांत (फोटो सौजन्य- PTI)

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांच्यामधील साधेपणा आणि त्यांचा अनोखा अंदाज या दोन गोष्टीमुळे त्यांना खूप मान दिला जातो. आपल्या अभिनयातून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले पाऊल टाकत प्रेक्षकांवर स्वत:ची एक वेगळीच छाप पाडली आहे. साऊथ चित्रपटांसोबत (South Movies) त्यांनी बॉलिवूडच्या जगतात आपले नाव कोरले आहे. तर त्यांचे चाहते त्यांना थलाइवा(Thalaiva) या नावाने हाक मारतात. जेव्हा कधीही रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होतात त्यावेळी सिनेमागृहांच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांकडून पूजा आणि फटाके फोडले जातात.

जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या रजनीकांत यांनी त्यांचे आयुष्य कायम सामान्य माणसासारखे ठेवले आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या भूमिकेनंतरही ते एका सामान्य व्यक्तीचे आयुष्य जगताना दिसून येतात. रजनीकांत यांचे संपूर्ण आयुष्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तर पाहूया रजीकांत यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी:

-रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड असे आहे. तर त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हे हवालदार म्हणून कार्यरत होते.

- वयाच्या 4 वर्षी रजीनीकांत यांच्या आईचा मृत्यू झाला

-घराची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कुलीचे कामसुद्धा केले आहे.

-बस कंटक्टरच्या नोकरीत ही रुजू झाले होते.

-रजनीकांत यांना अभिनय करण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी 1973 मध्ये मद्रास फिल्म संस्थान येथे प्रशिक्षणासाठी अर्ज करुन तेथून अभिनयाचे धडे घेतले.

-रजीकांत यांना त्यांच्या चित्रपटात पहिला ब्रेक वयाच्या 25 व्या वर्षात मिळाला होता.

-रजनीकांत यांना पहिला ब्रेक एक प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांनी दिला होता. तसेच 'अपूर्वा रागंलाल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तर एका नकारात्मक अभिनेत्याची भूमिका या चित्रपटातून रजनीकांत यांनी सकारली होती.

-1975 रोजी तमिळ भाषेतील चित्रपट छिलाकाम्मा चेप्पिनडी या चित्रपटातून रजनीकांत यांना मुख्य कलाकाराची भूमिका मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

-या सुपरस्टारने 'मेरी अदालत', 'जॉन जॉनी जनार्दन', 'भगवान दादा', 'दोस्ती दुश्मनी', 'इंसाफ कौन करेगा', 'असली नकली', 'हम', 'खून का कर्ज', 'क्रांतिकारी', 'अंधा कानून', 'चालबाज', 'इंसानियत का देवता' या सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

-बॉलिवूडमध्ये नव्हे तर अन्य देशातील चित्रपटांमध्येसुद्धा त्यांनी काम केले असून अमेरिकेच्या काही चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

-रजनीकांत यांना 2000 रोजी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच अभिनयासाठी खूप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

-रजीकांत यांनी 1981 मध्ये एथीरात महाविद्यालयातील लता यांच्याशी विवाह केला. तर त्यांना दोन मुली आहेत.

- रजनीकांत यांनी नुकतेच सत्तेत पदार्पण केले आहे. तर त्यांचा पक्ष तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

रजनीकांत यांनी अभिनयाच्या जोरावर हे सत्य करुन दाखवले आहे की, वय फक्त एक संख्या आहे. जर व्यक्तीने मेहनतीने काम करायचे ठरविले तर त्यासाठी वयाचे बंधन नसल्याचा अमूल्य संदेश त्यांनी लोकांना दिला आहे.