Raj Kundra Pornography Case: मुंबई गुन्हे शाखेने वर्सोवा आणि बोरिवली येथून कास्टिंग डायरेक्टरसह 4 जणांना केली अटक
Pornhub (Photo Credits: Unsplash)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography Case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा (Versova) आणि बोरिवली (Borivali) परिसरातून पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून, यामध्ये एका कास्टिंग डायरेक्टरचाही राजच्या कंपनीशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी जामीन मिळाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्प यांच्याविरुद्ध 1500 पानांचे चार्टशीट न्यायालयात दाखल केले होते आणि ते दोघेही या पॉर्नोग्राफी रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. या चौघांवरही मॉडेल्सकडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे नरेश कुमार रामावतार पाल, सलीम गुलाब सय्यद, अब्दुल गुलाब सय्यद आणि अमन सुभाष बर्नवार आहे.

Tweet

गेल्या वर्षी  19 जुलै रोजी केली होती अटक

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तत्पूर्वी त्याची तासंतास चौकशी करण्यात आली. राजचा कुंद्रच्या आयटी सहकारी रायन थॉर्प यालाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जुलैला अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्या होत्या, ज्यावरून राजने पॉर्न फिल्म बनवण्याच्या व्यवसायातून चांगली कमाई केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या चित्रपटांमधून दररोज 8 लाखांची कमाई करत असे. (हे ही वाचा Palghar: पालघरमध्ये 19 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार, दोन जणांवर आरोप)

कुंद्रा शिल्पाच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने आपली पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर 5 फ्लॅट ट्रान्सफर केले आहेत. वृत्तानुसार, राज कुंद्राने मुंबईतील किनारा या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राच्या नावावर हस्तांतरित केला आहे, ज्यात 5 फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर बांधला आहे. राज कुंद्रा यांचे खरे नाव रिपू ​​सुदान कुंद्रा आहे. सध्या या बंगल्यात शिल्पा आणि राज कुंद्रा राहतात.