‘कपूर’ कुटुंबाचा आधार हरपला; राज कपूर यांच्या पत्नीचे निधन
कृष्णा राज कपूर (Photo Credits: Facebook)

हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेते राज कपूर यांच्या पत्नीचे आज पहाटे निधन झाले. पहाटे 4 वाजता 88 वर्षांच्या कृष्णा कपूर यांची प्राणज्योत मालवली. 1946 साली राज कपूर हे कृष्णा कपूर यांच्याशी विवाहबंधनात अडकले होते. या या दांपत्याला रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रितु नंदा आणि रिमी जैन ही पाच अपत्ये आहेत.

कृष्णा कपूर यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कृष्णा राज कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी पोहचत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावरदेखील आपला शोक व्यक्त केला आहे.