![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/Shah-Rukh-Khan-784x441-380x214.jpg)
मार्केटिंग फर्म 'क्यूनेट’ घोटाळ्या (Qnet Scam) मध्ये सायबराबाद पोलिसांनी (Cyberabad Police) बॉलीवूडचे दिग्गज कलाकार शाहरुख खान, अनिल कपूर, जेकी श्रॉफ, बोमन इरानी, विवेक ओबराय यांना नोटीस जारी केली. या सर्व स्टार्सवर क्यूनेट कंपनीमध्ये भागीदारी आणि कंपनीचा प्रचार करणे हे आरोप आहेत. न्यूज एजन्सी एएनआयच्यामते गेल्या दोन दिवसांत सायबराबाद पोलिसांनी 500 लोकांना नोटीस दिली आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून 60 जणांना अटक करण्यात आली आहे. क्यूनेट ही हाँगकाँगची मार्केटिंग कंपनी आहे, ज्याचे संस्थापक विजय ईश्वरन, जोसेफ बिस्मार्क हे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, क्यूनेट घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा समजला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 3 लाख लोक शिकार बनले आहेत. हा घोटाळा आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि दिल्ली येथे चालू होता, या प्रकरणी आतापर्यंत 57 जणांना अटक करण्यात आली आहे. सायबराबाद पोलिसांकडे सुमारे 30 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, यापैकी 8 प्रकरणांवर स्वतः सीबीआय तपास करीत आहे. (हेही वाचा: मुंबई पालिका ई-निविदा घोटाळा: सहाय्यक आयुक्तासह 63 जण दोषी)
बॉलीवूड अभिनेत्यांव्यतिरिक्त क्रिकेटर युवराज सिंग आणि दक्षिणेची स्टार पूजा हेगडे यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नोटीस पाठवलेल्या सर्वांना एक आठवड्याचा वेळ दिला आहे, 4 मार्चपर्यंत त्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर या सर्वांनी 4 मार्चपर्यंत पोलिसांसमोर उपस्थिती दर्शवली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.