PC-X

Preity Zinta React on Morphed Picture: जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर, सोशल मीडियावर एक बनावट फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटाने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) मिठी मारल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, ही घटना सत्य हे आहे की फोटो मॉर्फ केलेला आहे हे प्रत्यक्षात समोर आलेले नव्हते. कारण, सामना झाल्यानंतर वैभव प्रिती झिंटाला (Preity Zinta) भेटला होता तसे फोटो ही समोर आले. दोघे भेटीदरम्यान, हस्तांदोलन करताना आणि बोलत असताना दिसले. मात्र, त्या दोघांनी गळाभेट घेतली हे दिसले नव्हते. मात्र, आता त्या दोघेचे गळाभेटीचे फोटो समोर आले आहे. जे ते अश्लीलरित्या बनवण्यात आल्याचे दिसत आहेत. CSK vs RR : राजस्थानचा आयपीयलमधला शेवट गोड; चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

एवढेच नाही तर काही वृत्तसंस्थांनी हे मॉर्फ फोटो वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. फोटो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर प्रिती झिंटावर टीक झाली त्यानंतर आता या व्हायरल कंटेंटवर प्रीतीने प्रतिक्रिया दिली आहे. अशा खोट्या बातम्या इतक्या वेगाने पसरत आहेत याचे तिला 'आश्चर्य' वाटले, असे प्रितीने पोस्टमध्ये लिहीले आहे.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज आयपीएल 2025 सामन्यानंतर प्रीती झिंटाने वैभव सूर्यवंशीची भेट घेतली

सूर्यवंशीला मिठी मारताना प्रीती झिंटाचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल

प्रीती झिंटाची फोटोंवर पोस्ट

दरम्यान, आता आयपूअलच्या उर्वरित हंगामात राजसस्थान संघ खेळताना दिसणार नाहीये. राजस्थानचे आव्हान संपूष्टात आले आहे.