One Plus Music Festival मध्ये Katy Perry आणि Dua Lipa यांच्यासह अनेक दिग्गज सिंगर होणार सहभागी, जाणून घ्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट
One Plus Music Event (Photo Credits-Twitter)

One Plus Music Festival चे आयोजन येत्या 16 नोव्हेंबरला मुंबईत करण्यात आले आहे. तर मुंबईतील DY Patil स्टेडिअम येथे हा म्युझिक फेस्टिव्हर पार पडणार आहे. यामध्ये हॉलिवूड मधील पॉप सिंगर केटी पेरी (Katy Perry), दुआ लिपा (Dua Lipa) यांच्यासह अन्य दिग्गज सिंगर मंडळी सहभागी होणार आहे. त्याचसोबत हॉलिवूडची मंडळी नाही तर ग्लोबल पॉप स्टार्स यांच्यासह भारतीय सिंगर्स त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. वन प्लसचा हा म्युझिक फेस्टिव्हल पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला आहे. तर वन प्लसचा हा फेस्ट भारतीय चाहत्यांच्या आठवणीत राहणाऱ्या सारखा पार पडणार आहे.

वन प्लसच्या म्युझिक फेस्टिव्हल मध्ये चाहत्यांना धमाकेधार परफॉर्मन्ससह गाण्यांचे लाइव्ह ऐकायला मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या केटी पेरी आणि दुआ लिपा हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. खासकरुन हॉलिवूड गाण्यांचे चाहते असणाऱ्यांसाठी हा फार औत्सुकतेचा दिवस ठरणार आहे. त्याचसोबत भारतीय सिंगर अमित त्रिवेदी, ऋत्विज यांच्यासोबत लोकल कलाकार सुद्धा त्यांच्या गाण्यांचे लाइव्ह परफॉर्मन्स देणार आहेत.(विज्ञानानुसार Bella Hadid ठरली पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिला; ग्रीक सौंदर्याच्या व्याख्येनुसार Perfect Face चे उत्तम उदाहरण Photos)

तर 16 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी शुल्क स्विकारले जाणार आहेत. त्यासाठी चाहत्यांना तिकिट बुकिंग करावी लागणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटाचे दर 3 हजार रुपये प्रती व्यक्ती असे ठेवण्यात येणार आहे. त्याचसोबत वन प्लस त्यांच्या सुपरफॅन्ससाठी मुख्य स्टेजजवळ एक वेगळा झोन तयार करणार आहे. जेणेकरुन त्या चाहत्यांना हा कॉन्सर्ट अगदी जवळून पाहता येणार आहे.