Priyanshu Painyuli Ties Knot with girlfriend Vandana Joshi: मिर्झापूर 2 मधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता प्रियांशु पैन्यूली याने गर्लफ्रेंड वंदना जोशी सोबत विवाहबद्ध झाला आहे. प्रियांशु ने डेहारडून येथील आपल्या घरी 26 नोव्हेंबर रोजी वंदना जोशी सोबत लग्नगाठ बांधली. दरम्यान, सेलिब्रेशन अद्याप संपलेले नाही. 28 नोव्हेंबर रोजी देखील काही सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. प्रियांशु-वंदना यांच्या लग्नाचे काही फोटोज समोर आले आहेत. मेंहदी, लग्न या सोहळ्यांमधील फोटोजची झलक यात पाहायला मिळत आहे.
वंदनाने सोशल मीडियावर मेहंदी सेरेमनी चे फोटोज शेअर केले आहेत. तर यात लग्नाचे फोटोजही पाहायला मिळत आहे. प्रियांशु-वंदनाची ग्रँड एन्ट्री देखील यात पाहायला मिळत आहे. (Mirzapur 2 मधील माधुरी यादव हिचे खऱ्या आयुष्यातील 'हे' काही फोटो पाहून व्हाल थक्क, See Pics)
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत प्रियांशु-वंदनाच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न पत्रिकेसोबत त्यांनी मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई किट्स देखील दिले होते.
प्रियांशु लवकरच 'रश्मि रॉकेट' या स्पोर्ट्स ड्रामा फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना कर्र यांनी केले आहे. यात एका कच्छच्या एका खेळाडूचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या सिनेमात प्रियांशु तापसी पन्नूच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.