Mirzapur 2 मधील माधुरी यादव हिचे खऱ्या आयुष्यातील 'हे' काही फोटो पाहून व्हाल थक्क (See Pics)
अभिनेत्री ईशा तलवार (Photo Credits: Instagram)

Mirzapur 2: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांनी नुकताच त्यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'मिर्जापुर 2' प्रदर्शित केली आहे. या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरु असून प्रेक्षकांचा सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियात ही यावर चर्चा केली जात आहे. या वेब सीरिजमध्ये यंदा खासकरुन फिमेल कॅरेक्टरवर अधिक फोकस करण्यात आला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या भुमिकेबद्दल सुद्धा लोकांकडून कौतुक केले जात आहे. तर यामध्ये त्यांनी साकारलेल्या भुमिकेला योग्य न्याय देण्याचा ही उत्तम प्रयत्न केला आहे.(Mirzapur 2: प्रदर्शनानंतर दोनच दिवसात 'मिर्झापूर 2' वादाच्या भोवऱ्यात; खासदार अनुप्रिया पटेल यांनी केली कारवाईची मागणी, जाणून घ्या कारण)

तर मिर्जापूर मधील अभिनेत्री ईशा तलवार (Isha Talwar) जी या वेब सीरिजमध्ये माधुरी यादव हिची भुमिका साकारत आहे. मुख्यमंत्री सूर्य प्रताप यादव यांच्या विधवा मुलीच्या रुपात ती दिसून येत आहे. तर आपल्या वडिलांसाठी निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच वेळी मुन्ना भैय्या याच्या सोबत तिची ओळख होत दोघांचे एकमेकांवर प्रेमाचे सुत जुळल्यानंतर विवाहबंधनात अडकतात. त्यामुळेच ईशा हिच्या सुद्धा भुमिकेची अधिक चर्चा आहे. तिचा साधेपणा आणि अंदाज लोकांच्या पसंदीस पडत आहे.(Mirzapur 2 ला पायरसीचे ग्रहण? सुपरहिट वेबसिरीजचे सर्व एपिसोड्स Telegram आणि TamilRockers वर लीक)

 

View this post on Instagram

 

Hi Babe! Naam jald pata chal jayega,batana kaisa laga:) #Mirzapur2

A post shared by Isha Talwar (@talwarisha) on

आता लोक सोशल मीडियात ईशा हिच्याबद्दल सर्च करु लागले आहेत. त्यामुळे तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सर्वसामान्य रुपात दिसून येणाऱ्या ईशा तर खऱ्या आयुष्यात अतिशय हॉट आणि बोल्ड आहे. इंटरनेटवरील तिचे हॉट फोटोशूट पाहून तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

ईशा हिने मल्याळम आणि हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. या व्यतिरिक्त ती तमिळ आणि तेलगु चित्रपटांचा सुद्धा हिस्सा आहे. ती गेल्या 8 वर्षापासून मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये आपले काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

Wild and free,not really @gavinkleinschmidt :)

A post shared by Isha Talwar (@talwarisha) on

मुंबईत जन्मलेली ईशा हिचे वय 32 वर्ष असून ती इथेच वाढली आहे. तिने मुंबईतील सेंट झेवियर्स मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ईशा ही प्रशिक्षित डान्सर सुद्धा आहे. 'हमारा दिल आपके पास' या मधून ईशाने बालकालाकारची भुमिका सुद्धा साकारली होती.

 

View this post on Instagram

 

Statutory warning: Legs are photoshopped @gavinkleinschmidt!!!!

A post shared by Isha Talwar (@talwarisha) on

मिर्जापूर 2 व्यतिरिक्त ही नुकतीच प्रदर्शित झालेला चित्रपट 'गिन्नी वेड्स सनी' मध्ये सुद्धा झळकली होती. तर आता लवकरच फरहान अख्तर याचा चित्रपच 'तुफान' मध्ये भुमिका साकारताना दिसून येणार आहे.