Mirzapur 2: प्रदर्शनानंतर दोनच दिवसात 'मिर्झापूर 2' वादाच्या भोवऱ्यात; खासदार अनुप्रिया पटेल यांनी केली कारवाईची मागणी, जाणून घ्या कारण
Divyendu Sharma and Pankaj Tripathi in Mirzapur 2 (Photo Credits: YouTube)

पहिल्या सिझनच्या यशानंतर आता ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजचा दुसरा भाग (Mirzapur 2) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शिव्या असलेले संवाद, हिंसाचार, राजकारण आणि आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी होणारी भांडणे दर्शवणारी ही सिरीज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. अशात आता मिर्झापूर 2 नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (MP Anupriya Patel) यांनी ही सिरीज आपल्या क्षेत्राची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्याच्या खासदार आणि अपना दल (एस) च्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुपिया पटेल ‘मिर्झापूर 2’ वेब सीरिजच्या निषेधार्थ उभ्या राहिल्या आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे ज्यामध्ये त्या म्हणतात. ‘सन्माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात मिर्जापूरचा विकास चालू आहे आणि ते सामंजस्याचे केंद्र आहे. मात्र आता ‘मिर्झापूर’ नावाच्या वेबसिरीजच्या माध्यमातून हा परिसर हिंसक म्हणून दाखवत त्याची बदनामी करण्यात येत आहे. तसेच या सिरीजद्वारे जातीय वैमनस्य पसरवले जात आहे. (हेही वाचा: सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा (Watch Video))

पुढे त्या म्हणतात, ‘मिर्झापूर जिल्ह्याची खासदार या नात्याने माझी मागणी आहे की, या गोष्टीची चौकशी केली जावी आणि त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे.’ दरम्यान, मिर्झापूर 2 दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे आणि मिर्झापूर 1 प्रमाणे यामध्येही दाखवलेल्या गोष्टी कधीच मिर्झापूरचा इतिहास नव्हता. मिर्झापूर 2 रिलीज होण्यापूर्वीच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावर निषेध व्यक्त केला होता. मिर्झापूर 1, 2018 साली प्रदर्शित झाला होता. मिर्जापूर 2 मध्ये दिवेन्दु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी असे कलाकार आहेत. त्याच बरोबर त्याचे दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी केले आहे.