फिटनेस फ्रिक आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) याचा आज 55 वा वाढदिवस. मिलिंदने 55 व्या बर्थ डे दिवशी सोशल मीडीयात एक न्यूड फोटो पोस्ट केला आहे. आयर्नमॅन सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये धावणार्या मिलिंदने आज समुद्र किनारी न्यूड रन केले आहे. त्याचा एक फोटो त्याने पोस्ट केला आहे. ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’असं लिहीत त्याने फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण सोशल मीडीयात खळबळ पसरवणारा हा त्याचा काही पहिलाच फोटो नव्हे. PM Modi Interacts with Fitness Influencers: फिट इंडिया मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलिंद सोमण याच्याशी साधला संवाद; पहा फिटनेसबद्दल काय म्हणाला आयर्न मॅन.
नव्वदच्या दशकामध्ये अनेकींचा हार्ट थ्रोब असणार्या मिलिंद सोमण याने यापूर्वी एक्स मिस इंडिया आणि मॉडेल मधु सप्रे सोबत न्यूड फोटो शूट केले होते. प्रिंट मीडियामध्ये ते छापून देखील आले होते. फीटनेस फ्रीक मिलिंद अनेक मॅरेथॉनमध्ये धावतो. महिलांच्या फीटनेससाठी देखील त्याच्याकडून विशेष प्रयत्न केले जातात. पिंकेथॉन मधून तो महिलांसाठी विशेष जनजागृतीचं काम करतो. बेअर फूट धावण्याची त्याची स्टाईल यापूर्वी अनेकदा त्याच्या चाहत्यांनी पाहिली असेल पण यावर्षी वाढदिवसाचं औचित्य साधत त्याने चक्क समुद्र किनार्यावर न्यूड धावत बर्थ डे दिवसाची सुरूवात केली आहे.
मिलिंद सोमण फोटो पोस्ट
दरम्यान मिलिंदने काही वर्षांपूर्वीच अंकिता कोंवर सोबत लग्न केले आहे. आजचा बर्थ डे स्पेशल फोटो देखील अंकितानेच टिपला आहे. गायिका अलिशा चिनॉयसोबत मिलिंद सोमण 'मेड इन इंडिया' गाण्यामध्ये झळकला आणि हे गाणं तुफान गाजलं. त्यानंतर मिलिंदने मॉडेलिंग सोबत कला, सिनेमा क्षेत्रात काही निवडक कामं केली. अनेक जाहिराती, ब्रॅन्ड मध्ये मिलिंद सोमण हा हवाहवासा चेहरा बनला.