मराठी सिनेसृष्टीतील 'या' जोड्या पुढील वर्षी होणार विवाहबद्ध; दिवाळी 2020 निमित्त अभिनेत्रींची खास पोस्ट
Sonalee-Kunal & Mitali-Siddharth (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी पुढच्या वर्षी विवाहबद्ध होणार असल्याचे तिने एका पोस्टमधून सांगितले आहे. दिवाळीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये तिने होणाऱ्या पतीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने पुढच्या वर्षी पाडवा मिसेस म्हणून साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा झाला. 18 मे रोजी सोनालीने साखरपुड्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सोनालीने आपल्या पोस्टमध्ये होणाऱ्या पतीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले, "पुढच्या वर्षीचा पाडवा as Mrs." हे फोटोज 2018 मधील असून अभिनेता सुबोध भावे याच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या प्रिमियरचे आहेत. (मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या साखरपुड्याला झाले 6 महिने पूर्ण; कुणाल बेनोडेकरला होकार दिल्याचा एक Romantic फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन व्यक्त केला आनंद)

सोनाली कुलकर्णी पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अशीच काहीशी पोस्ट मराठी सिनेसृष्टीतील अजून एका क्युट कपलने केली आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे क्युट कपल सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते. दरम्यान, मितालीने दिवाळीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये सिद्धार्थसोबतचे फोटो शेअर करत पुढच्या वर्षी मिस्टर आणि मिसेस होणार असल्याचे म्हटले आहे. मितालीने पोस्टमध्ये लिहिले, "Mr. and Mrs. next year! हॅप्पी दिवाली." (सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे 'Underwater' हॉट फोटोशूट पाहून तुम्ही व्हाल थक्क, नक्की पाहा)

मिताली मयेकर पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

24 जानेवारी 2019 रोजी सिद्धार्थ-मिताली यांचा साखरपूडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. लग्नाची तारीख अद्याप कळलेली नसली तरी पुढील वर्षी या जोड्या विवाहबद्ध होणार हे आता निश्चित झाले आहे. मात्र या दोन्ही पोस्टमुळे सोनाली-कुणाल आणि मिताली-सिद्धार्थ यांच्या चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.