
मराठी सिनेसृष्टीतील सध्या चर्चेत असलेले हॉट कपल म्हणजे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar). 2019 च्या पहिल्याच महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला त्यानंतर ही जोडी त्यांच्या फोटोमुळे, सोशल मिडियावरील त्यांच्या एकमेकांना केलेल्या कमेंट्समुळे बरीच चर्चेत आली. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मिडियावरही बरेच सक्रिय दिसतात. सध्या सोशल मिडियावर त्या दोघांचे रोमँटिक फोटोशूट बरेच चर्चेत आले आहे. मात्र हे फोटोशूट नेमके कशाचे आहे याबाबत दोघांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाहीय. त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र हे त्यांचे हे प्री-वेडिंग फोटोशूट आहे याबाबत चर्चा रंगू लागली. या फोटोशूट नुकतेच त्यांनी पाण्यात केलेले अंडरवॉटर फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोमध्ये ते दोघेही खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटमधील त्यांचा अपीअरन्स देखील 'Made For Each Other' असाच दिसत आहे. पाहा हे फोटोज:
24 जानेवारी 2019 दिवशी या जोडीने वांद्रे येथील MIG Club मध्ये साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. दोन्ही कुटुंबियांसह मराठी सिनेसृष्टीतील जवळच्या मित्रपरिवारातील कलाकारांनी या जोडीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आले होते.
अलीकडेच त्यांनी बेडवरील हॉट आणि क्युट फोटोशूट देखील सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे 2019 या वर्षाची साखरपुडा करुन केलेली गोड सुरुवात सिद्धार्थ आणि मिताली वर्षाअखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्नाने गोड शेवट करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.