Siddharth Chandekar- Mitali Mayekar Engagement: मुंबईत पार पडला सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा,  #SidMit च्या या खास सोहळ्यात मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती
मुंबईत पार पडला सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा (Photo Credits: Instagram)

Siddharth Chandekar- Mitali Mayekar Engagement:  मराठी सिनेसृष्टीतील चुलबुली जोडी सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकरने (Mitali Mayekar) काही दिवसांपूर्वी ते रिलेशनशीपमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली होती. काल ( 24 जानेवारी 2019) दिवशी या जोडीने वांद्रे येथील MIG Club मध्ये साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. दोन्ही कुटुंबीयांसह मराठी सिनेसृष्टीतील जवळच्या मित्रपरिवारातील कलाकारांनी या जोडीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर करण्यात आले आहेत.

सिद्धार्थ-मितालीच्या साखरपुड्याचा क्षण -

सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने शेअर केली खास बातमी आणि फोटो  

सिद्धार्थ चांदेकर मूळचा पुण्याचा तर मिताली मयेकर मुंबईकर आहे. कामाच्या निमित्ताने एका शुटिंग दरम्यान त्यांची ओळख झाली पुढे मैत्री, रिलेशनशीप आणि आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने पारंपारिक पद्धतीने साखरपुडा केला. हिरव्या रंगामध्ये दोघांचेही कपडे खास डिझाईन करण्यात आले होते.

मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती 

 

View this post on Instagram

 

New beginning!!! Congratulations and khuuuup love!!! 😘😘😘😘 #tinypanda

A post shared by Hemant Dhome (@hemantdhome21) on

 

View this post on Instagram

 

Congratulations #tinypanda 😘😘😘😘😘

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

सिद्धार्थची सुरूवात नाटक आणि मालिकांमधून झाली. स्टार प्रवाहवरील 'अग्निहोत्र' ही सिद्धार्थची पहिली मराठी मालिका आहे. तर मिताली मयेकर 'अनुबंध' मालिकेत बालकलाकार आणि नुकतीच 'फ्रेशरर्स' मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती. यासोबतच मिताली पिंकाथॉनची युथ अ‍ॅम्बॅसेडरही आहे. या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!