गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला गणेश पंडित दिग्दर्शित मेकअप चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) ही जोडी प्रथमच आपल्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील जुळली गाठ गं हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्या पाठोपाठ आता या चित्रपटातील मस्त रोमँटिक, भावनिका असे हृद्याला स्पर्शून जाणारे 'करार प्रेमाचे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे सुप्रसिद्ध गायक नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टॉनी कक्कर यांनी गायिले आहे. या मराठी गाण्याला नेहा कक्करचे गाजलेले गाणे 'मिले हो तुम हमको' या गाण्याची ताल देण्यात आली आहे.
हे गाणे मंगेश कंगने यांनी लिहिले असून टॉनी कक्कर या गाण्याचे संगीतकार आहेत. नेहा कक्कर हिचे हिंदीतील प्रसिद्ध गाणे 'मिले हो तुम हमको' या गाण्याची ताल देण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ:
या चित्रपटात रिंकू राजगुरु, चिन्मयसह प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर तेजपाल वाघ हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
कागर नंतर आता रिंकूचा तिसरा मराठी चित्रपट येत आहे. गणेश पंडित यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मराठीमधील विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेकअप या चित्रपटासाठी रिंकूने तब्बल 27 लाख मानधन घेतले आहे. हे मानधन कोणत्याही मराठी कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा सर्वात जास्त आहे. सध्याच्या आघाडीच्या तारका एका चित्रपटासाठी साधारण 15 लाख रुपये घेतात.
मेकअप सिनेमाच्या टीझरमध्ये रिंकू राजगुरू झिंगलेल्या अवस्थेत पहायला मिळाली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये समान्य मुलगी, मेकअप आणि समजाची तिच्यावर यावरून होणारी तानेशाही यावर भाष्य करण्यात आले आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये केवळ रिंकू राजगुरूची झलक पहायला मिळली आहे. बिनधास्त अंदाजातील रिंकूचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.