Julali Gaath Ga Song in Makeup: रिंकू राजगुरु आणि चिन्मय उद्गगीरकर यांच्या लग्नसराईची सुंदर झलक दाखवणारे 'मेकअप' चित्रपटातील हे सुरेल गाणे एकदा पाहाच
Makeup Song (Photo Credits: YouTube)

आपली सर्वांची लाडकी आर्ची लवकरच मेकअप चित्रपटातून एक नव्या लूकमध्ये आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटासाठी तिने 27 लाख इतके मानधन घेतले असल्याची बातमी आपल्या कानांवर आली होती. त्यामुळे अनेकांच्या या चित्रपटाविषयी भुवया उंचावल्या असून रिंकूचे चाहते रिंकूच्या नव्या 'मेकअप' (Makeup) चित्रपटाची वाट पाहात आहे. नुकतच या चित्रपटातील नवीन गाणे 'जुळली गाठ गं' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि सह अभिनेता चिन्मय उद्गगीरकर (Chinmay Udgirkar) यांच्या लग्नसराईतील हे गाणे असल्याचे व्हिडिओ वरुन दिसत आहे. शाल्मली खोलगडे या सुप्रसिद्ध गायिकेने हे गाणे गायिले आहे.

वैभव देशमुख यांनी हे गाणे लिहिले असून एव्ही प्रफुलचंद्र यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच या गाण्यात रिंकू आणि चिन्मयचा बिनधास्त अंदाज देखील पाहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- MakeUp Official Trailer Out: रिंकू राजगुरू घेऊन आलीय आपल्या 'मेकअप' चे गुपित; पाहा धमाकेदार ट्रेलर

या चित्रपटात रिंकू राजगुरु, चिन्मयसह प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर तेजपाल वाघ हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मेकअप सिनेमाच्या टीझरमध्ये रिंकू राजगुरू झिंगलेल्या अवस्थेत पहायला मिळाली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये समान्य मुलगी, मेकअप आणि समजाची तिच्यावर यावरून होणारी तानेशाही यावर भाष्य करण्यात आले आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये केवळ रिंकू राजगुरूची झलक पहायला मिळली आहे. बिनधास्त अंदाजातील रिंकूचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.