Makeup Trailer (Photo Credits: YouTube)

आपल्या रावडी अंदाजाने सर्वांचे मनोरंजन करुन प्रेक्षकांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) ऊर्फ आर्ची आता लवकरच एका नव्या लूकमध्ये आपल्यासमोर येणार आहे. 'मेकअप' (Makeup)असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत होती. त्याच्या जोडीला आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रथमच रिंकू आणि चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) ही जोडी पाहायला मिळणार आहे. लग्नासाठी वधू-वर निवडण्याची कथा या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. यात येणारे धमाकेदार, मजेशीर आणि गंभीर अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे.

गणेश पंडित (Ganesh Pandit) दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- 'सैराट' फेम रिंकू राजगुरू ठरली मराठी मधील सर्वात महागडी अभिनेत्री; 'मेकअप'साठी घेतले इतके मानधन

या चित्रपटात रिंकू राजगुरु, चिन्मयसह प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर तेजपाल वाघ हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

कागर नंतर आता रिंकूचा तिसरा मराठी चित्रपट येत आहे. गणेश पंडित यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मराठीमधील विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेकअप या चित्रपटासाठी रिंकूने तब्बल 27 लाख मानधन घेतले आहे. हे मानधन कोणत्याही मराठी कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा सर्वात जास्त आहे. सध्याच्या आघाडीच्या तारका एका चित्रपटासाठी साधारण 15 लाख रुपये घेतात.

मेकअप सिनेमाच्या टीझरमध्ये रिंकू राजगुरू झिंगलेल्या अवस्थेत पहायला मिळाली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये समान्य मुलगी, मेकअप आणि समजाची तिच्यावर यावरून होणारी तानेशाही यावर भाष्य करण्यात आले आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये केवळ रिंकू राजगुरूची झलक पहायला मिळली आहे. बिनधास्त अंदाजातील रिंकूचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.