रितेश देशमुखचा 'माऊली' अवतार WhatsApp Sticker Pack, GIF च्या माध्यमातूनही रसिकांच्या भेटीला ! कसे डाऊनलोड कराल हे स्टिकर्स ?
WhatsApp Sticker Pack (Photo Credits : Twitter)

MAULI WhatsApp Stickers : 'लय भारी' (Lai Bhari) नंतर आता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'माऊली' (Mauli) सिनेमातून पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रमोशनसाठी आता डिजिटल माध्यामाही तकदीने वापरलं जातं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून युजर्समध्ये लोकप्रिय असलेल्या WhatsApp Sticker च्या माध्यमातून आता माऊली आणि सिनेमाची सारी टीम रसिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.

WhatsApp Sticker वर रितेश देशमुख साकारत असलेल्या 'माऊली',सैय्यामी खेर ( Saiyami Kher) साकारत असलेल्या 'रेणुका' आणि जितेंद्र जोशी साकारत असलेल्या ' नाना' या खलनायकाचे काही अंदाज, डायलॉग्स WhatsApp Sticker च्या माध्यमातून शेअर करण्यात आले आहेत. MAULI Trailer : माऊली सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रसिकांच्या भेटीला, Salman Khan ने केला ट्विट

कसे कराल डाऊनलोड ?

माऊली सिनेमाचे WhatsApp Sticker मोफत उपलब्ध आहेत.

  • Google Play Store मध्ये  जाऊन तुम्ही MAULI WhatsApp Stickers असे टाईप करून हा  WhatsApp Sticker Pack डाऊनलोड करू शकता.
  • bit.ly/MauliStickers या लिंकवरही तुम्हांला माऊली सिनेमाच WhatsApp Sticker Pack डाऊनलोड करता येऊ शकतात.
  • हा पॅक डाऊनलोड झाल्यानंतर तो ओपन करा. त्यामध्ये Add to WhatsApp चा पर्याय दिसेल.
  • यानंतर काही वेळात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ते अपडेट होईल.

WhatsApp Sticker प्रमाणे माऊली  GIF मध्येदेखील उपलब्ध आहेत. माऊली सिनेमाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख नुकताच बिग बॉस 12च्या सेटवरही पोहचला होता. सलमान खानसोबत रितेशने धम्माल मस्ती केली. सलमान खानकडून रितेशने मराठीत काही डायलॉग्स वदवून घेतले.