MAULI Trailer :  माऊली सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रसिकांच्या भेटीला, Salman Khan ने केला ट्विट
Mauli Trailer( Photo Credit : Youtube )

Mauli Trailer : लई भारी (Lai Bhari)  नंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  'माऊली' (Mauli)  या आगामी सिनेमात दिसणार आहे. आज माऊलीचा ट्रेलर सोशल मीडियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. रितेश देशमुख  (Riteish Deshmukh)  , सय्यामी खेर ( Saiyami Kher), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) , जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)  हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सय्यामी खेर ही माऊलीची मुख्य नायिका या सिनेमातून मराठीत सिनेमात पदार्पण करणार आहे. रितेश देशमुखची धमाकेदार अ‍ॅक्शन, गावरान अंदाज, रोमॅन्टिक नायक या विविध छटांनी पोलिस इन्सपेक्टर माऊली सर्जेराव देशमुख ही भूमिका सजली आहे.

 

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून माऊलीचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. 'लय भारी' सिनेमामध्ये सलमान खान खास भूमिकेत दिसला होता. त्याप्रमाणे माऊलीमध्ये दिसणार का ? या प्रश्नाचं उत्तर ट्रेलरमध्ये नाही. त्यासाठी सलमानच्या चाहत्यांना काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

दारू दुकानदाराच्या भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशी विरूद्ध  माऊली रूपेरी पडद्यावर भिडणार आहे. बाजी सिनेमानंतर जितेंद्र पुन्हा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता कमालीची वाढली आहे. रितेशने कालच  Mauli चा खलनायक धर्मराजची झलक दाखवली होती.

अजय अतुल या संगीतकार जोडीने सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.  MAULI First Song: रितेश देशमुखच्या माऊली सिनेमातील 'माझी पंढरीची माय' गाणे रसिकांच्या भेटीला आदित्य सरपोतदार याने माऊली सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  14 डिसेंबरला माऊली सिनेमा रिलीज होणार आहे.