Mauli चा खलनायक धर्मराजची झलक, Mauli Trailer 29  नोव्हेंबरला येणार
mauli villain Photo Credit : Twitter

Mauli Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) चा 'माऊली' (Mauli)  सिनेमातील धडाकेबाज अंदाज पाहिल्यानंतर अनेकांना या सिनेमातील इतर पात्रांबाबत उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी मुख्य नायिका सय्यामी खेरची ( Saiyami Kher)  झलक चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर आज रितेशने चित्रपटातील खलनायक धर्मराजची झलक शेअर केली आहे. हद्दीत राहायचं !!! दहशतीचं दुसर नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय २९ नोव्हेंबर ला.... असं ट्विट रितेश देशमुखने केले आहे.

 

29 नोव्हेंबरला 'माऊली' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे. रितेशने केलेल्या ट्विटनुसार 'माऊली' सिनेमाचा खलनायक तितकाच तोडीस तोड असेल याची कल्पना रसिकांना आली असेल. धर्मराजच्या भूमिकेत कोण कलाकार असेल? हे नाव मात्र रितेशने गुलदस्त्यात ठेवलं आहे.  पाहा- माऊली सिनेमाचा टीझर

सय्यामी खेर 'माऊली'च्या माध्यमातून मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे. 'लय भारी'च्या बॉक्सऑफिसवरील दमदार कमाईनंतर पुन्हा रितेश मराठी सिनेमाकडे वळला आहे. या चित्रपटातील गाणं कार्तिकी एकादशीदिवशी रिलिज करण्यात आलं होते. MAULI First Song: रितेश देशमुखच्या माऊली सिनेमातील 'माझी पंढरीची माय' गाणे रसिकांच्या भेटीला

माऊली सिनेमात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहे. माऊली हेच रितेशच्या भूमिकेचं नाव आहे. मात्र आता तो पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'माऊली' सिनेमा 14 डिसेंबरला रिलीज होणार आहे.