MAULI Official Teaser : ' लय भारी' नंतर रितेश देशमुख 'माऊली' मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला
माऊली' सिनेमाचा टीझर Photo Credit : Youtube

शाहरुख खानच्या झिरो (Zero) चित्रपटासाठी रितेश देशमुखने आपल्या आगामी 'माऊली' सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला आहे. आता बॉक्सऑफिस वरील झिरो आणि माऊली टक्कर टाळली आहे. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ता वर रितेश देशमुखने ' माऊली' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. ' लय भारी' या रितेशच्या मराठीतील डेब्यू सिनेमाचा 'माऊली' हा सिनेमा सिक्वेन्स आहे. 'लय भारी' यशानंतर रितेश देशमुख 'माऊली'सोबत प्रेक्षकांच्या भेटीला; लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर पोस्टर लॉन्च

माऊली सिनेमात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहे. माऊली हेच रितेशच्या भूमिकेचं नाव आहे. मात्र आता तो पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या रूपातील माऊली सिनेमात काय करणार ? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. आदित्य सरपोतदार याने माऊली सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अजय अतुल ही जोडी या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन सांभाळणार आहेत. 14 डिसेंबरला माऊली सिनेमा रिलीज होणार आहे.

माऊली सिनेमात रितेश देशमुख पुन्हा धमाके दार ऍक्शन मराठी रुपेरी पडद्या वर घेऊन येणार आहे. रितेश व्यतिरिक्त या सिनेमात इ तर कोणते कलाकार झळकणार आहेत याबाबत फारसा खुलासा करण्यात आलेला  नाही मात्र सयामी खेर हा हिंदी चेहरा दिसण्याची शक्यता आहे.