 
                                                                 मराठमोळा असला तरी हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा. तसेच, 'लय भारी' या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या थेट हृदयातच जागा मिळवणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. मराठी चित्रपट कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपटाने रितेशला 'लय भारी' साथ दिली. या चित्रटातील त्याची 'माऊली' ही व्यक्तिरेखा प्रचंड भाव खाऊन गेली. त्यामुळे माऊली आणि अभिनेता रितेश देशमुख असे एक हटके समिकरण तयार झाले. नेमक्या याच समिकरणाचा प्रभावी वापर करत रितेश पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. रितेशचा 'माऊली' हा चित्रपट येत्या १४ डिसेंबर २०१८ ला चित्रपटगृहात झळकत आहे. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत रितेशने या चित्रपटाचे पोस्टरही लॉन्च केले आहे.
आपल्या ट्विटर हॅंडलवरुन रितेशने 'माऊली' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करताना रितेशने दिवाळीचा मुहूर्त साधला आहे. 'दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! तुमचा माऊली पुन्हा एकदा येतोय तुमच्या भेटीला!! लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी, माऊलीचं पहिलं पोस्टर!!लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी, माऊलीचं पहिलं पोस्टर!!' अशा वेगवेगळ्या आणि तितक्याच दमदार पंचलाईन (कॅप्शन) शेअर करत रितेशने 'माऊली'चं 'लय भारी' पोस्टर रिलीज केले आहे.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! तुमचा माऊली पुन्हा एकदा येतोय तुमच्या भेटीला!!#मीमाऊली #येतोयमाऊली#yetoymauli #mauliteaser pic.twitter.com/MFPdIF0nrH
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 7, 2018
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनीही हे पोस्टर शेअर केले आहे. त्यांनीही लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी, माऊलीचं पहिलं पोस्टर!! असी कॅप्शन लिहिली आहे. दरम्यान, आषाढी एकादशीच्या मुहूर्त साधून रितेशने 'माऊली' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली होती. त्या वेळी 21 डिसेंबर ही माऊलीची रिलिज डेट असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, या तारखेत बदल होऊन एक आठवडा आगोदरच म्हणजेच १४ डिसेंबर २०१८ ला हा चित्रपट रिलिज होणार आहे. (हेही वाचा, बॉक्सऑफिसवरील Zero विरूद्ध 'माऊली' टक्कर टळली)
लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी, माऊलीचं पहिलं पोस्टर!! #मीमाऊली #येतोयमाऊली #memauli #yetoymauli pic.twitter.com/rdtOPrbePr
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 7, 2018
आदित्य सरपोददार यांचे दिग्दर्शन, अजय-अतुल यांचे संगित या चित्रपटाला आहे. तर, रितेश देशमुखसह सैयामी खेर हीसुद्धा या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
