बॉक्सऑफिसवरील Zero विरूद्ध 'माऊली' टक्कर टळली, रितेश देशमुख  लवकरच जाहीर करणार माऊलीची नवी रीलिज डेट
रितेश देशमुखचा 'माऊली' आणि शाहरुख खानचा 'जिरो'Photo credit Facebook

शाहरूख खानच्या वाढदिवसादिवशी त्याच्या आगामी 'झिरो' (ZERO) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. शाहरूख खानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. मात्र शाहरूखच्या 'झिरो' (ZERO)' सिनेमाची रीलिज डेट रितेशच्या 'माऊली' सोबत क्लॅश होत असल्याने रितेश देशमुखने त्याच्या सिनेमाच्या रीलिज डेटमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे ख्रिस्मसच्या  सुट्ट्यांमध्ये केवळ 'जिरो' हा सिनेमा रीलिज होणार आहे.

रितेश देशमुखचा दुसरा मराठी सिनेमा 'माऊली' हा 21 डिसेंबर 2018 ला रीलिज होणार होता. मात्र याच दिवशी शाहरूखचा  'झिरो' देखील रिलिज होणार असल्याने महाराष्ट्रात पुन्हा स्क्रिन शेअर करण्याचं गणित बांधावं लागणार होतं. मात्र शाहरूखने रितेशला त्याच्या आगामी मराठी सिनेमाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. रितेशनेही शाहरूखच्या विनंतीला मान देऊन त्याच्या सिनेमाचं रीलिज पुढे ढकललं आहे.  पहा  Zero सिनेमाचा ट्रेलर  

आदित्य सरपोतदारने 'माऊली' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ' फास्टर फेणे'नंतर रितेश आणि आदित्य ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार आहे. 'जिरो'मुळे पुढे ढकललेली 'माऊली'ची नवी रीलिज डेट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  माऊली या सिनेमाची निर्मिती देखील रितेश देशमुखने केली आहे.