Hemangi Kavi | (Photo Credit : Facebook)

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हेमांगी कवी हिने सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलेली एक पोस्ट यासाठी निमित्त ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ती एक स्त्री म्हणून जे काही सांगू पाहात आहे त्यास नेटीझन्सकडून पाठिंबा मिळताना दिसतो आहे. यात काही कलाकार म्हणून वावारणारी मंडळी आणि सोशल मीडिया वापरणारे सर्वसामान्य वापरकर्ते म्हणजेच युजर्सही आहेत. हेमांगी कवी हिने 'बाई, बुब्स आणि ब्रा' (Women Boobs And Bras) या शिर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. यात प्रामुख्याने पुरुषांना जशी समाजात मोकळीक मिळते तशी स्त्रियांना का नाही? या मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष वेधले आहे. आपल्या पोस्टमधून ती 'बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (Nipples, Tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा Choice असू शकतो!', असे ठासून सांगताना दिसते.

हेमांगी कवी ही विविध विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून या आधीही स्त्री स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन बोलताना दिसली आहे. या आधी तिने “गोल पोळ्याचं गुपित!” या शिर्षकाखाली इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. त्यात तिने “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.” असे म्हणत तिला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले होते. आताही तिने फेसबुक पोस्टच्या (Hemangi Kavi Facebook Post) माध्यमातून जोरदार फटकारे ओढल्याचे पाहायला मिळते. अभिनेता प्रविण तरडे, रसीका आगाशे, विना जामकर यांसारख्या कलाकारांनी तसेच काही युजर्सनीही तिला पाठिंबा दर्शवला आहे. (हेही वाचा, पैसे थकवणाऱ्या लोकांवर भडकली अभिनेत्री हेमांगी कवी; 'पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेजेस करायचे...', See Post)

हेमांगी कवी हिची फेसबुक पोस्ट (Hemangi Kavi Facebook Post)

हेमांगी कवी आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने तिने साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांनी विशेष पसंत केल्या आहेत. आतापर्यंत ती 'फू बाई फू' या विनोदी कार्यक्रमातून ठळकपणे लोकांच्या समोर आली आहे. या शिवाय तिने 'सेम टू सेम' यासारखी नाटके तर पारध, पांगीरा, गोळा बेरीज, धर्मांतर यांसारखे काही चित्रपट केले आहेत.