First Look Poster: अजय फणसेकर दिग्दर्शित 'सिनियर सिटीझन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Senior Citizen Movie (Photo Credits: Facebook)

रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे अजय फणसेकर आता घेऊन येत आहेत एक नवा कोरा सिनेमा "सिनियर सिटीझन". या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

पहा चित्रपटाचा First Look

Senior Citizen Poster (Photo Credits: Facebook)

पाठमोरी उभी असलेली सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लूक आहे. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याचं कुतुहल निर्माण झालं आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका असून इतर काही महत्वपूर्ण कलाकारांची नावे ही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

ओम क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद व विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, , बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.