
Anandi Gopal Motion Poster: भारतातील पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi) यांचा जीवनप्रवास लवकरच 'आनंदी गोपाळ' (Anadi Gopal) सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचा टीझर आणि गाणं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये रीलिज करण्यात आलं आहे. प्रेक्षकांनीही टीझर आणि 'रंग माळियेला' या गाण्याला तुफान प्रतिसाद दिला. मात्र सिनेमात डॉ. आनंदीबाई जोशी ही मुख्य भूमिका नेमकं कोण करणार? हे गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. अखेर 'झी स्डुडिओ'कडून शेअर करण्यात आलेल्या खास मोशन पोस्टरद्वारा डॉ. आनंदीबाईंच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) असल्याचा उलगडा करण्यात आला आहे.
अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद मुख्य भूमिकेत
'बालक पालक' आणि 'उबंटू' मराठी सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आगामी 'आनंदी गोपाळ' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भाग्यश्री सोबत अभिनेता ललित प्रभाकर गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारणार आहे. 1886 साली जेव्हा भारतामध्ये मुलींना भारतामध्येही शिक्षण घेणं हा रूढीवादी समाजाला पटणारं नव्हतं त्यावेळेस आनंदीबाईंनी अमेरिकेला जाऊन वैद्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. गोपाळरावांसोबत बालवयात झालेला आनंदीबाईंचा विवाह ते भारतातील पहिली महिला डॉक्टर हा प्रवास सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा रसिकांसमोर येणार आहे. 'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझर वरून बनवलेले धम्माल Memes सोशल मीडियावर व्हायरल!
समीर विद्धंस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा 15 फेब्रुवारी 2019 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.