'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझर वरून बनवलेले धम्माल Memes सोशल मीडियावर व्हायरल!
Anandi Gopal Memes (Photo credits: Facebook, Instagram)

Anandi Gopal Memes:  भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी  यांचा जीवनप्रवास  'आनंदी गोपाळ'(Anandi Gopal) सिनेमातून  रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. गोपाळरावांसोबत झालेला बालविवाह ते भरातातील पहिली महिला डॉक्टर  हा त्यांच्या जीवनातील  मोठा पल्ला पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. सिनेमाची पहिली झलक टीझरच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. अल्पावधीतच या टीझरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रतिक्रिया व्यक्त करताना काहींनी कल्पनाशक्तीचा वापर करून या टीझरमधून मजेदार मिम्स बनवले आहेत. त्यामुळे टीझरच्या सोबतीने आता मिम्सदेखील व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Gallit Prabhakar! विषय cut! #aplatimealay @lalit.prabhakar @sameervidwans @ZeeStudios #anandigopal

A post shared by Bindhast मराठी (@bindhastmarathi) on

आनंदी गोपाळ या सिनेमामध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका साकारत आहे. तर आनंदीबाईंच्या भूमिकेत कोणती नायिका असेल ही बाब अजूनही गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आली आहे. 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.